Photos: इंदिरा आणि फिरोज गांधी यांच्या लग्नाला नेहरुंचा का होता विरोध ? | Marriage Anniversary | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Photos: इंदिरा आणि फिरोज गांधी यांच्या लग्नाला नेहरुंचा का होता विरोध ?

Feroze Gandhi and Indira Gandhi Love Story

स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना देशाची आयर्न लेडी म्हटले जाते. पदावर असताना त्यांनी असे अनेक निर्णय घेतले, जे खुप आव्हानात्मक होते. त्यामुळे देशाच्या राजकारणात त्यांचे अग्रगण्य स्थान आहे. त्यांचे वैयक्तीक आयुष्यही तेवढेच गाजले. इंदिरा गांधी यांचा प्रेम विवाह झाला होता. इंदिरा गांधींनी 26 मार्च 1942 मध्ये फिरोज गांधीं यांच्या सोबत लग्न केले.

फिरोज आणि इंदिरा यांची ओळख 1930 मध्ये झाली होती. या ओळखीला निमीत्त झाल्या होत्या कमला नेहरू. भारतीय स्वातंत्र्यासाठी तेव्हा आंदोलन सुरु होते. एका कॉलेजसमोर धरणे आंदोलन सुरु असतानी कमला नेहरु बेशुद्ध पडल्या होत्या. तेव्हा फिरोज गांधींनी त्यांची देखभाल केली होती. कमला नेहरूंना टीबी झाल्यानंतर उपचारासाठी त्या यूरोपात गेल्या तेव्हा फिरोज त्यांना भेटण्यासाठी गेले होते.
1936 मध्ये जेव्हा कमला नेहरुंचे निधन झाले तेव्हा फिरोज गांधी तिथे उपस्थित होते. कदाचित यामुळेच इंदिरांच्या मनाच्या कोपऱ्यात फिरोज यांना स्थान मिळाले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.

फिरोज आणि इंदिरा यांची ओळख 1930 मध्ये झाली होती. या ओळखीला निमीत्त झाल्या होत्या कमला नेहरू. भारतीय स्वातंत्र्यासाठी तेव्हा आंदोलन सुरु होते. एका कॉलेजसमोर धरणे आंदोलन सुरु असतानी कमला नेहरु बेशुद्ध पडल्या होत्या. तेव्हा फिरोज गांधींनी त्यांची देखभाल केली होती. कमला नेहरूंना टीबी झाल्यानंतर उपचारासाठी त्या यूरोपात गेल्या तेव्हा फिरोज त्यांना भेटण्यासाठी गेले होते. 1936 मध्ये जेव्हा कमला नेहरुंचे निधन झाले तेव्हा फिरोज गांधी तिथे उपस्थित होते. कदाचित यामुळेच इंदिरांच्या मनाच्या कोपऱ्यात फिरोज यांना स्थान मिळाले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.

लग्नाच्यावेळीही इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले होते. फिरोज गांधी यांनी सुरवातीला 1933 मध्ये इंदिरांना त्यांच्या आई कमला नेहरू यांच्याकडे लग्नासाठी मागणी घातली होती. परंतु, त्यावेळी त्या फक्त 16 वर्षाच्या होत्या. त्या लहान असल्याचे कारण पुढे करून त्यांनी लग्नाला नकार कळवला. पुढे फिरोज गांधी यांच्या कामावर इंदिरा प्रभावित झाल्या. आणि त्यांनी त्यांच्यासोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला.

या विवाहाला इंदिरा गांधी यांचे वडील जवाहरलाल नेहरु तयार नव्हते. मात्र वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन इंदिरांनी मार्च 1942 मध्ये फिरोज यांच्यासोबत लग्न केले. या लग्नात इंदिरांना मिळालेली सर्वात मोठी भेट म्हणजे महात्मा गांधींनी त्यांचे आडनाव इंदिरा आणि फिरोज यांना दिले. कालांतराने पंडित नेहरुंनीही हे नाते स्वीकारले आणि या लग्नाला मान्यता दिली.

फिरोज जहांगीर गांधी यांचा जन्म 12 सप्टेंबर 1912 रोजी झाला होता हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार व राजकारणी आणि एक प्रखर भ्रष्टाचारविरोधक होते. फिरोज गांधी हे दिल्लीतील नॅशनल हॅराल्ड व लखनौतील नवजीवन या दैनिकांचे प्रकाशक होते. ते राज्यसभेचे सदस्य होते आणि त्यांनी सभागृहात नेहरूंच्या राजकारणाचा आणि राज्यकारभाराचा सतत विरोध केला.

फिरोज गांधी यांच्या आडनावाचा ही खूप मोठा इतिहास सांगितला जातो. फिरोझ गांधी यांचे वास्तविक फिरोझ जहांगीर घांधे असे होते असे सांगितले जाते. 1930 मध्ये आपले शिक्षण सोडून दिल्यानंतर फिरोझ घांधे यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये प्रवेश केला. अनेक तरुण गांधीच्या विचाराने प्रेरित होऊन स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेत होते. याच काळात फिरोज गांधी महात्मा गांधीच्या विचाराने प्रेरित झाले आणि त्यांनी आपले आडनाव घांधे बदलून घेऊन गांधी असे करण्याचा निर्णय घेतला व ते पुढे फिरोज गांधी या नावाने ओळखले जाऊ लागले, असा उल्लेख फ्रँक कॅथरिन यांच्या 'द लाईफ ऑफ इंदिरा नेहरू गांधी या पुस्तकात सापडतो.

दांपत्याला राजीव व संजय अशी दोन मुले झाली. संजय गांधी आणि राजीव गांधी पण त्यानंतर दोघा भावांमध्ये दुरावा वाढत गेला. दरम्यानच्या काळात फिरोज गांधींचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. संजय गांधी यांचा अपघातात मृत्यु झाला होता तर राजीव गांधी यांचा बाँबस्फोट घडवून हत्या करण्यात आली होती. यानंतर 1984 ला इंदीरा गांधी यांच्यावर गोळ्या झाडून  हत्या करण्यात आली.