Film Shooting And Tourist Spot : चित्रपटांनी प्रसिद्ध केली काही प्रेक्षणीय स्थळे
Film Shooting And Tourist Spot बॉलिवूडचा आपल्या जीवनावर मोठा प्रभाव आहे. चित्रपटांमुळे फॅशनपासून नवनवीन ट्रेंड समोर येतात. इतकंच नाही तर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ज्या ठिकाणी शूटिंग केले जाते ती ठिकाणे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध होतात. पर्यटकांमध्ये त्या ठिकाणाची ओळख चित्रपटातून निर्माण होते. या यादीत शाहरुख खानपासून ते आमिर खानपर्यंतच्या चित्रपटांचा समावेश आहे.
गोवा हे असेच एक ठिकाण आहे जे तरुणांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. ‘दिल चाहता है’चे शूटिंग गोव्यातील अगडा किल्ल्यावर झाले. चित्रपटाचे शूटिंग ज्या ठिकाणी झाले ते आता चित्रपटाच्या नावावरूनच ओळखले जाते.
उटी हे चित्रपट निर्मात्यांचे आवडते ठिकाण आहे. साजन, राज आणि गोलमाल अगेनचे शूटिंग येथे झाले आहे. याशिवाय छैय्या छैय्या हे गाणेही येथे चित्रित करण्यात आले आहे.
‘जोधा अकबर’ चित्रपटाच्या शूटिंगचा मोठा भाग जयपूरच्या आमेर फोर्टमध्ये झाला आहे. जेथे भव्य वैभव आजही दिसते.
‘जब वी मेटआमध्ये ‘गीत’चा प्रवास मुंबईपासून सुरू होतो आणि तो पंजाब, शिमला, मनाली आणि रोहतांग मधून जातो. चित्रपटात दाखवण्यात आलेली सुंदर दृश्ये कोणाचेही मन मोहून टाकतील. चित्रपटातील ‘ये इश्क’ या गाण्यातही हिमाचलच्या संस्कृतीची झलक पाहायला मिळते.
‘३ इडियट्स’मधला लडाखचा सीन कोण विसरू शकेल जिथे करीना कपूर वधूच्या पोशाखात स्कूटरवर येते. विशेषत: ‘३ इडियट्स’मुळे लोक त्या ठिकाणी भेट देतात.
‘रंग दे बसंती’ इंडिया गेट ते दिल्लीतील नजफगड किल्ल्यापर्यंत दाखवण्यात आली आहे. चित्रपटातील जंपिंग सीन असो किंवा प्लेन सीन याआधी कोणत्याही चित्रपटात इतक्या सुंदरपणे दाखवण्यात आले नव्हते. ‘रंग दे बसंती’नंतर नजफगड किल्ल्याला पर्यटन स्थळ म्हणून नवी ओळख मिळाली.
रोहित शेट्टीच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’ चित्रपटानंतर चेन्नईत पर्यटकांची संख्या वाढली. या चित्रपटात शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण होती.