पोरं शाळेला चालली...पालकांना काळजी इम्युनिटीची!

शाळा मुलांची काळजी कशी घेणार हा प्रश्न पालकांना सतावतो आहे
school reopen
school reopen
Updated on

आजपासून मुलांच्या (Kids) शाळा (School (सुरू झाल्या आहेत. दोन वर्षांनी मुलं शाळेत जात आहेत. एकीकडे मुलांना शाळेत जायचा उत्साह, आनंद असला तरी पालकांना (Parents) मात्र कोरोनाची (Corona) भिती सतावते आहे. त्यामुळे शाळा मुलांची काळजी कशी घेणार हा प्रश्न पालकांना सतावतो आहे. मुलांचे लसीकरण झालेले नाही. त्यामुळे त्यांना धोका अधिक आहे. कोरोनाबरोबर ओमिक्रॉनचेही सावट आहे. त्यामुळे पालक अधिक चिंतेत आहेत. पालक सध्या मुलांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहावी यासाठी विविध पर्याय शोधत आहेत. यात पौष्टीक पदार्थांपासून, स्वच्छता, सॅनिटायझरचा योग्य वापर आदी गोष्टींचा समावेश आहे. कोरोनाचे सावट असले तरी मुलांची इम्युनिटी पावर योग्य राखायची असेल तर या गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे.

पौष्टीक नाश्ता हवाच-
सकाळचा नाश्ता (BreakFast) हा आरोग्याने परिपूर्ण असावा. त्यामुळे मुलांना दिवसभर उत्साही, सक्रीय राहण्यासाठी शक्ती मिळेल. तसेच त्यांची रोगप्रतिकारक शक्ती  जलद वाढण्यास मदत होईल. त्यासाठी दलिया, बेसनाचा घावन, रव्याचा उपमा, राजगीरा लाडू, खीर असे पदार्थ मुलांना नाश्त्यासाठी देऊ शकता.
पौष्टीक नाश्ता हवाच- सकाळचा नाश्ता (BreakFast) हा आरोग्याने परिपूर्ण असावा. त्यामुळे मुलांना दिवसभर उत्साही, सक्रीय राहण्यासाठी शक्ती मिळेल. तसेच त्यांची रोगप्रतिकारक शक्ती जलद वाढण्यास मदत होईल. त्यासाठी दलिया, बेसनाचा घावन, रव्याचा उपमा, राजगीरा लाडू, खीर असे पदार्थ मुलांना नाश्त्यासाठी देऊ शकता.esakal
school reopen
अचानक वातावरण बदललय! अशी घ्या मुलांची काळजी
जेवताना आमटी -भातावर भर द्या- तांदूळात बी जीवनसत्व आणि अमिनो ऍसिड असते. तर डाळीत अनेक प्रकारची जीवनसत्वे प्रथिने असतात. त्यामुळे आमटी-वरण-भात खाल्ल्याने शरीराला आवश्यक असणारी सर्व जीवनसत्वे, प्रथिने अगदी सहज मिळतात. त्यामुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढतेच. ही शक्ती वाढल्याने त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास होण्यास मदत होते. जर तुमचं मुल आमटी किंवा वरण खात नसेल तर त्याला दही भात खायला देऊ शकता.
जेवताना आमटी -भातावर भर द्या- तांदूळात बी जीवनसत्व आणि अमिनो ऍसिड असते. तर डाळीत अनेक प्रकारची जीवनसत्वे प्रथिने असतात. त्यामुळे आमटी-वरण-भात खाल्ल्याने शरीराला आवश्यक असणारी सर्व जीवनसत्वे, प्रथिने अगदी सहज मिळतात. त्यामुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढतेच. ही शक्ती वाढल्याने त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास होण्यास मदत होते. जर तुमचं मुल आमटी किंवा वरण खात नसेल तर त्याला दही भात खायला देऊ शकता. esakal
school reopen
लहान मुलांमध्ये वाढतोय लठ्ठपणा; बदलत्या जीवनशैलीचा परिणाम
फळे- भाज्या खायला द्या-
मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी त्यांना हंगामी फळे- भाज्या खायला द्या. थंडीत तुम्ही मुलांना पालेभाज्या, सूप, ज्युस असे काही पदार्थ तयार करून देऊ शकता.यामुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली वाढेल. तसेच रोगाचा संसर्ग होण्याचा धोका कमी होईल. त्यांचा शारीरिक,मानसिक विकासही चांगला होईल.
फळे- भाज्या खायला द्या- मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी त्यांना हंगामी फळे- भाज्या खायला द्या. थंडीत तुम्ही मुलांना पालेभाज्या, सूप, ज्युस असे काही पदार्थ तयार करून देऊ शकता.यामुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली वाढेल. तसेच रोगाचा संसर्ग होण्याचा धोका कमी होईल. त्यांचा शारीरिक,मानसिक विकासही चांगला होईल.
school reopen
सावधान! लहान मुलांना ओमिक्रॉन होण्याचं प्रमाण वाढलं | South Africa
स्वच्छतेवर लक्ष द्या-
कोरोना, ओमिक्रॉनसारख्या गंभीर व्हायरसपासून वाचण्यासाठी मुलांनी स्वच्छतेची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे वेळोवेळी त्यांना हाथ-पाय धुण्याची, स्वच्छ करण्याची सवय लावा. मुलांना या व्हायरसची माहिती देऊन त्यांना परिणामांची स्पष्ट कल्पना द्या. त्यांना त्यांच्या आरोग्याविषयी सतर्क राहण्यास शिकवा. जेवणाआधी-नंतर हात स्वच्छ धुणे, दात,जीभ, तोंड स्वच्छ करण्याची सवय लावा. मुलांची नखे नेहमी कापलेली असतील, हे बघाच. कारण नखात मळ असेल तर इंफेक्शन होण्याचा धोका असतो.
स्वच्छतेवर लक्ष द्या- कोरोना, ओमिक्रॉनसारख्या गंभीर व्हायरसपासून वाचण्यासाठी मुलांनी स्वच्छतेची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे वेळोवेळी त्यांना हाथ-पाय धुण्याची, स्वच्छ करण्याची सवय लावा. मुलांना या व्हायरसची माहिती देऊन त्यांना परिणामांची स्पष्ट कल्पना द्या. त्यांना त्यांच्या आरोग्याविषयी सतर्क राहण्यास शिकवा. जेवणाआधी-नंतर हात स्वच्छ धुणे, दात,जीभ, तोंड स्वच्छ करण्याची सवय लावा. मुलांची नखे नेहमी कापलेली असतील, हे बघाच. कारण नखात मळ असेल तर इंफेक्शन होण्याचा धोका असतो. esakal
शारीरिकदृष्ट्या सक्रीय असणे गरजेचे- मुलांनी निरोगी राहण्यासाठी शारीरिकदृष्ट्या सक्रीय असणे गरजेचे आहे. यासाठी दिवसातून २० ते ३० मिनिटं मुलांना खेळू द्या. जास्त वेळ खेळणार असतील तरी चालेल. यामुळे त्यांच्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारेल. रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहण्याबरोबरच त्यांचा मानसिक,शारीरिक विकास होईल. पालकही मुलांबरोबर योगासने करू शकतात.
शारीरिकदृष्ट्या सक्रीय असणे गरजेचे- मुलांनी निरोगी राहण्यासाठी शारीरिकदृष्ट्या सक्रीय असणे गरजेचे आहे. यासाठी दिवसातून २० ते ३० मिनिटं मुलांना खेळू द्या. जास्त वेळ खेळणार असतील तरी चालेल. यामुळे त्यांच्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारेल. रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहण्याबरोबरच त्यांचा मानसिक,शारीरिक विकास होईल. पालकही मुलांबरोबर योगासने करू शकतात. esakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com