Aurangabad Famous Food: औरंगाबादची प्रसिद्ध इम्रती तुम्ही खाल्लीय का?
मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरामध्ये अनेक उत्तम पदार्थ मिळतात.स्वातंत्र्यपूर्व काळात हे शहर निजामाचा भाग होते. स्वातंत्र्यानंतर औरंगाबादचा विकास झपाट्याने झाले.
शहरात वेगवेगळे उद्योग आणि त्या उद्योगाच्या निमित्तानं कामगार आहे.
औरंगाबादमध्ये आज भिन्न संस्कृतीचे लोकं एकत्र राहतात.
शहराची ही भिन्न संस्कृती येथील खाद्यपदार्थामध्येही उतरली आहे.
औरंगाबादच्या जगप्रसिद्ध पदार्थांच्या यादीमध्ये इम्रतीचा क्रमांक वरचा आहे.
औरंगाबाद शहराच्या मध्यवर्ती भागातील गुलमंडीमध्ये उत्तम मिठाई भांडार आहे.
उत्तम मिठाई भांडारात वेगवेगळ्या प्रकारचे गोड पदार्थ मिळतात. पण, येथील जिलेबी आणि भज्यापासून बनवले जाणारे पदार्थ विशेष प्रसिद्ध आहेत.
विशिष्ट पद्धतीने बनवली जाणारा इम्रती हा पदार्थ औरंगाबादकरांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. अगदी परदेशातून शहरात परतलेले औरंगाबादकरही इम्रतीची चव चाखण्यासाठी इथं येतात.