Friday Box Office Report : सध्या बरेच नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. चित्रपटांची सर्व गणितं शुक्रवारवर ठरत असतात. कालचा शुक्रवार ब्लॉकबास्टर शुक्रवार ठरला. विशेष म्हणजे सर्व चित्रपटांच्या तुलनेने कार्तिक आर्यन (kartik aryan), कियारा आडवाणी (kiara advani)आणि तब्बू च्या 'भूलभुलैया 2' (bhul bhulaiyya 2) ने सर्वाधिक कमाई केली. हिंदी, कन्नड़, पंजाबी और तेलुगू चित्रपट बॉक्स ऑफिसवर शुक्रवारी १८.५३ कोटींची उलाढाल झाली. 'भुल भुलैय्या'च्या स्पर्धेतील कोणते आहेत हे चित्रपट ते पाहूया..
भूल भुलैया 2 : (bhul bhulaiyya 2) बॉलीवुड अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा आडवाणी यांचा 'भूल भुलय्या' हा चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किमया केली. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 14.75 कोटी रुपयांची कमाई केली.
धाकड (DHAKAD) : कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलय्या' पुढे बॉलीवुड क्वीन कंगना रणौतचा (kangana ranaut) 'धाकड' अयशस्वी ठरला आहे. कंगनाने आजवर केलेल्या एकूण चित्रपटांपैकी सर्वाधिक कमी कलेक्शन केलेला हा चित्रपट ठरला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या दिवशी केवळ १.२० कोटींची कमाई या चित्रपटाने केली.
(KGF CHAPTER 2) केजीएफ 2 : कन्नड़ अभिनेता यश च्या या चित्रपटाने आजवरचे सगळे रेकॉर्ड तोडले आहेत. १२ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांना भुरळ घातली. आज अनेक चित्रपट स्पर्धेत उतरूनही हा चित्रपट तेजीत चालला आहे. १४ एप्रिल पासून आजपर्यंत एकूण १२१३ कोटींची कमाई या चित्रपटाने केली आहे.
सरकारु वारी पाटी : सुपरस्टार महेश बाबू (mahesh babu)चा बहुप्रतीक्षित 'सरकारु वारी पाटी' कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष होते. परंतु बॉक्स ऑफिस वर कमाई करण्यात हा चित्रपट मागे पडला आहे.या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यात आले होते पण नऊ दिवसात या चित्रपटाने केवळ दीड कोटींची कमाई केली आहे.
सौकन सौकने : (saukan saukane) अमरजीत सिंह सरोनचा हा पंजाबी प्रादेशिक भाषेतील चित्रपट रिलीज होऊन एक आठवडा उलटून गेला. आजपर्यंत या चित्रपटाने १७ कोटींहून अधिक कमाई केली आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.