Friendship Day: 'फ्रेंडशिप' टिकवायची? बॉलीवूडचे 10 चित्रपट अजिबात चुकवू नका|Friendship Day Special Bollywood top 10 movies | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Friendship Day: 'फ्रेंडशिप' टिकवायची? बॉलीवूडचे 10 चित्रपट अजिबात चुकवू नका

Friendship Day news

Friendship Day Special: मैत्री दिनाचे आता सर्वांना वेध लागले आहेत. बॉलीवूडमध्ये फ्रेंडशीप विषयांवर वेगवेगळे चित्रपट आजवर तयार झाले आहेत. आयुष्यातील सर्वाधिक काळ लक्षात राहणारा प्रवास म्हणजे मैत्रीचा प्रवास, त्याच्या आठवणी,काही भन्नाट प्रसंग हे नेहमीच आपल्याला सोबत करत असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्री नावाचं प्रकरण हे येतचं. अर्थात प्रत्येकाला त्याचे येणारे अनुभवही वेगळे आहेत. मैत्री दिनाच्या निमित्तानं आपण बॉलीवूडमधील काही गाजलेल्या चित्रपटांविषयी जाणून घेणार आहोत.सोनू के टिटू की स्वीटी (Sonu Ke Titu ki Sweety)


 फुकरे (Fukrey) 
 हा चित्रपट तुम्हाला तुमच्या कॉलेज डे ची आठवण करुन दिल्य़ाशिवाय राहणार नाही. तरुणाईच्या गंमती जमती, त्यांची भन्नाट केमिस्ट्री हे सारं फुकरे मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. बॉक्स ऑफिसवर देखील त्याला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली होती. फ्रेंडशीप, त्याचा अर्थ हे सारं प्रभावीपणे या चित्रपटातून मांडण्यात आले आहे.

फुकरे (Fukrey) हा चित्रपट तुम्हाला तुमच्या कॉलेज डे ची आठवण करुन दिल्य़ाशिवाय राहणार नाही. तरुणाईच्या गंमती जमती, त्यांची भन्नाट केमिस्ट्री हे सारं फुकरे मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. बॉक्स ऑफिसवर देखील त्याला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली होती. फ्रेंडशीप, त्याचा अर्थ हे सारं प्रभावीपणे या चित्रपटातून मांडण्यात आले आहे.

कॉकटेल (Cocktail) 
सैफ अली खान, दीपिका यांची प्रमुख भूमिका असलेल्या कॉकटेलनं तरुणाईला आकर्षित केले होते. त्यातील संवाद, गाणी प्रेक्षकांना कमालीची भावली होती. फ्रेंडशिप टिकविण्यासाठी काहीवेळा आपल्याला त्यागही करावा लागतो. हे त्यात प्रभावीपणे सांगण्यात आले आहे.

कॉकटेल (Cocktail) सैफ अली खान, दीपिका यांची प्रमुख भूमिका असलेल्या कॉकटेलनं तरुणाईला आकर्षित केले होते. त्यातील संवाद, गाणी प्रेक्षकांना कमालीची भावली होती. फ्रेंडशिप टिकविण्यासाठी काहीवेळा आपल्याला त्यागही करावा लागतो. हे त्यात प्रभावीपणे सांगण्यात आले आहे.

सोनू के टिटू की स्वीटी (Sonu Ke Titu ki Sweety) 
बॉलीवूडमध्ये फ्रेंडशिप मुव्हीचे नाव घेतल्यानंतर या चित्रपटाचे नाव पुढे येते. कार्तिक आर्यनच्या भन्नाट अॅक्टिंगला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. प्रेमाचा आगळा वेगळा त्रिकोण यात पाहायला मिळतो. प्रेमाबरोबरच मैत्रीही किती महत्वाची आहे हे सांगणारा हा चित्रपट तरुणाईला भावला होता.

सोनू के टिटू की स्वीटी (Sonu Ke Titu ki Sweety) बॉलीवूडमध्ये फ्रेंडशिप मुव्हीचे नाव घेतल्यानंतर या चित्रपटाचे नाव पुढे येते. कार्तिक आर्यनच्या भन्नाट अॅक्टिंगला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. प्रेमाचा आगळा वेगळा त्रिकोण यात पाहायला मिळतो. प्रेमाबरोबरच मैत्रीही किती महत्वाची आहे हे सांगणारा हा चित्रपट तरुणाईला भावला होता.

अँग्री इंडियन गॉडेस- (Angry Indian Goddesses) 
 सात मैत्रींणीचा ग्रुप पुन्हा एकदा जमतो. त्या गेट टू गेदरमध्ये पुन्हा रम्य त्या आठवणींना उजाळा मिळतो. एकमेकांची गुपितं शेयर होतात. प्रत्येकाच्या वाटा वेगळ्या झाल्या असताना मैत्रीचा बंध त्यांना पुन्हा एकत्र आणतो. हे या चित्रपटाचे महत्वाचे  सुत्र आहे. ते पाहताना आपल्याला हमखास जाणवते.

अँग्री इंडियन गॉडेस- (Angry Indian Goddesses) सात मैत्रींणीचा ग्रुप पुन्हा एकदा जमतो. त्या गेट टू गेदरमध्ये पुन्हा रम्य त्या आठवणींना उजाळा मिळतो. एकमेकांची गुपितं शेयर होतात. प्रत्येकाच्या वाटा वेगळ्या झाल्या असताना मैत्रीचा बंध त्यांना पुन्हा एकत्र आणतो. हे या चित्रपटाचे महत्वाचे सुत्र आहे. ते पाहताना आपल्याला हमखास जाणवते.

जिंदगी मिलेगी ना दोबारा - (Zindagi Na Milegi Dobara) 
फरहान अख्तर दिग्दर्शित या चित्रपटानं पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर कमाल केली होती. याचे कारण त्यानं जिंदगी मिलेगी ना दोबारा सारखा चित्रपट बनवला होता. त्याला मिळालेला प्रतिसाद प्रचंड होता. युवा वर्गाला तो भावला होता. ऋतिक रोशन, अभय देओल, कतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका त्यात होत्या.

जिंदगी मिलेगी ना दोबारा - (Zindagi Na Milegi Dobara) फरहान अख्तर दिग्दर्शित या चित्रपटानं पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर कमाल केली होती. याचे कारण त्यानं जिंदगी मिलेगी ना दोबारा सारखा चित्रपट बनवला होता. त्याला मिळालेला प्रतिसाद प्रचंड होता. युवा वर्गाला तो भावला होता. ऋतिक रोशन, अभय देओल, कतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका त्यात होत्या.

थ्री इटियट्स - (3 Idiots) 
राजकुमार हिरानी यांच्या थ्री इडियट्सनं बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवला. चेतन भगत यांच्या थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ या कादंबरीवर आधारित या चित्रपटाला अभुतपूर्व प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. आजही बॉलीवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांमध्ये या चित्रपटाचा समावेश होतो.

थ्री इटियट्स - (3 Idiots) राजकुमार हिरानी यांच्या थ्री इडियट्सनं बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवला. चेतन भगत यांच्या थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ या कादंबरीवर आधारित या चित्रपटाला अभुतपूर्व प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. आजही बॉलीवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांमध्ये या चित्रपटाचा समावेश होतो.

 ये जवानी है दिवानी (Yeh Jawani Hai Deewani) 
 आजच्या तरुणाईला तुम्ही विचारलं की, तुमचा आवडता फ्रेंडशिप चित्रपट कोणता त्यावर ते ये जवानी दिवानीचे नाव सांगितल्याशिवाय राहणार नाही. रणबीर कपूर, दीपिका पदुकोण, यांच्या प्रमुख भूमिका त्यात होत्या. त्यातील गाणी, संवाद हे लोकप्रिय झाले होते. प्रीतम यांचे संगीत लाभलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

ये जवानी है दिवानी (Yeh Jawani Hai Deewani) आजच्या तरुणाईला तुम्ही विचारलं की, तुमचा आवडता फ्रेंडशिप चित्रपट कोणता त्यावर ते ये जवानी दिवानीचे नाव सांगितल्याशिवाय राहणार नाही. रणबीर कपूर, दीपिका पदुकोण, यांच्या प्रमुख भूमिका त्यात होत्या. त्यातील गाणी, संवाद हे लोकप्रिय झाले होते. प्रीतम यांचे संगीत लाभलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

चिल्लर पार्टी (Chillar Party) 
बच्चे कंपनीच्या अनोख्या मैत्रीचा बंध या चित्रपटामध्ये पाहायला मिळतो. लहान मुलांना तर हा चित्रपट हमखास आवडतोच पण मोठ्यांनाही त्याची भुरळ पडलेली असते. लहान मुलांनी त्यामध्ये केलेला अभिनय कौतूकास्पद आहे. विनोदी ढंगानं सांगितलेल्या कथेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

चिल्लर पार्टी (Chillar Party) बच्चे कंपनीच्या अनोख्या मैत्रीचा बंध या चित्रपटामध्ये पाहायला मिळतो. लहान मुलांना तर हा चित्रपट हमखास आवडतोच पण मोठ्यांनाही त्याची भुरळ पडलेली असते. लहान मुलांनी त्यामध्ये केलेला अभिनय कौतूकास्पद आहे. विनोदी ढंगानं सांगितलेल्या कथेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.


दिल चाहता है (Dil Chahta Hai) 
फ्रेंडशिपची गोष्ट करायची आणि दिल चाहता है विषयी बोलायचे नाही अस होणार नाही. असं म्हटलं जातं की, गोवा जास्तीत जास्त एक्सप्लोर झाला याला कारण दिल चाहता है आहे. फॅशन ट्रेडिंग होण्यातही या चित्रपटाचे योगदान आहे. तीन मित्रांची गोष्ट, त्यांची स्वप्नं, त्यांची व्यक्तिमत्व, त्यांचा संघर्ष आणि त्यांची अतुट मैत्री हे सारं विनोदी, काहीशा मिश्किल पद्धतीनं फरहान अख्तरनं प्रेक्षकांना सांगितली आहे.

दिल चाहता है (Dil Chahta Hai) फ्रेंडशिपची गोष्ट करायची आणि दिल चाहता है विषयी बोलायचे नाही अस होणार नाही. असं म्हटलं जातं की, गोवा जास्तीत जास्त एक्सप्लोर झाला याला कारण दिल चाहता है आहे. फॅशन ट्रेडिंग होण्यातही या चित्रपटाचे योगदान आहे. तीन मित्रांची गोष्ट, त्यांची स्वप्नं, त्यांची व्यक्तिमत्व, त्यांचा संघर्ष आणि त्यांची अतुट मैत्री हे सारं विनोदी, काहीशा मिश्किल पद्धतीनं फरहान अख्तरनं प्रेक्षकांना सांगितली आहे.

वीरे दे वेडिंग (Veere Di Wedding) 
 खरं सांगायचं तर हा चित्रपट त्यातील संवादामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्यातील व्दि अर्थी संवाद प्रेक्षकांना खटकले होते. मात्र तरुणाईनं या चित्रपटाचे स्वागत केले होते. करिना, स्वरा भास्कर, सोनम कपूर यांच्या त्यात प्रमुख भूमिका होत्या.

वीरे दे वेडिंग (Veere Di Wedding) खरं सांगायचं तर हा चित्रपट त्यातील संवादामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्यातील व्दि अर्थी संवाद प्रेक्षकांना खटकले होते. मात्र तरुणाईनं या चित्रपटाचे स्वागत केले होते. करिना, स्वरा भास्कर, सोनम कपूर यांच्या त्यात प्रमुख भूमिका होत्या.