Nashik : गोदावरीला पूर! दुतोंडया मारुतीच्या छातीपर्यंत आले पाणी

Nashik Rain
Nashik Rainesakal
Updated on

नाशिक : बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘गुलाब’ चक्रीवादळाची प्रणाली महाराष्ट्राकडे आल्याने राज्यात पावसाने तडाखा दिला आहे. सद्या गुलाब चक्रीवादळ ओसरले असले, तरी त्याच्या प्रभावामुळे असलेल्या अतितीव्र कमी दाब क्षेत्रामुळे (डिप्रेशन) महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे.

नाशिकच्या गंगापूर धरणातून (Gangapur Dam) पाणी सोडल्यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे या पुराच्या पाण्यात गोदाकाठची दुकाने हलवली जात आहेत; पुराच्या पाण्याची पातळी अजून वाढणार असल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्क केले जात आहे. नदी लगतच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे. अन्य नागरिकांनी नदीजवळ पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये. आजही अतिवृष्टीचा इशारा विचारात घेता नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये. असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com