- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- मनोरंजन
- सप्तरंग
- YIN युवा
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- धन की बात
- क्रीडा
- आणखी..
- करिअर-नोकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- Myfa
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- दैनंदिन भविष्य
- साप्ताहिक भविष्य
- संपादकीय
- विज्ञान तंत्रज्ञान
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- ब्लॉग
- फुड
- आरोग्य
- काही सुखद
- प्रतिक्रिया-युनियन-बजेट
- वुमेन्स-कॉर्नर
- अर्थसंकल्प 2022
एकमेकांना शेण मारुन 'या' शहरात साजरा करतात एक विचित्र 'सण'


भारतातील महत्त्वाच्या सणांमध्ये 'दिवाळी' हा सर्वात खास सण मानला जातो. देशाच्या विविध राज्यांतील कर्नाटक आणि तामिळनाडूच्या सीमेवर असलेल्या गुमतापुरा गावात स्थानिक लोक दिवाळीची सांगता दरवर्षी एकमेकांना शेण मारुन (गोरहब्बा उत्सव) करतात.

या उत्सवात सहभागी होणारे गावातील लोक दुपारी गाय मालकांच्या घरी जाऊन शेण गोळा करतात. त्यानंतर हे शेण ट्रॅक्टरनं गावातील मंदिरात आणलं जातं.

मंदिराच्या पुजाऱ्याकडून शेणाची पूजा केली जाते आणि नंतर मोठ्या प्रमाणात गोळा केलेलं शेण मोकळ्या मैदानात ठेवलं जातं. यानंतर, पुरुष मोकळ्या मैदानात प्रवेश करतात आणि एकमेकांवर शेणाचे गोळे किंवा लाडू फेकण्यास सुरवात करतात.

दरवर्षी या उत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी भारताच्या विविध भागातून लोक गुमतापुरा गावात येतात. असे म्हणतात की, शेणाची ही लढाई पाहिल्यानं आरोग्यास लाभ होतो.

स्थानिक शेतकरी महेश यांनी एएफपीच्या वृत्तात म्हटलंय, 'की जर कोणाला काही आजार असेल तर तो या महोत्सवात सहभागी होऊन बरा होऊ शकतो.'

कोविड-19 महामारी असूनही 2021 मध्ये 'गोरहब्बा उत्सव' साजरा करण्यात आला. यावेळी स्थानिक अधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला परवानगी दिली आणि अल्पसंख्येनं लोक उत्साहानं यात सहभागी झाले.

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.