दिवसभर दमछाक झाल्यानंतर घरी बिछान्यात पडून झोपावसं वाटते. आपण अक्षरशः आडवे पडतो, कसेही झोपतो. परंतु, यामुळे पाठीच्या कण्याला त्रास (Spinal cord injury) होऊन पाठीचे किंवा मानेचे दुखणे (Neck pain) उद्भवू शकतात. त्यामुळे शारीरिक स्थितीकडे नेहमी लक्ष द्यायला हवे. आपण वेगवेगळ्या स्थितीत झोपत असतो. याचा परिणाम झोपेवरही (Habit of sleeping on the stomach) होऊ शकतो. एका ठरावीक स्थितीत झोपू नये, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
पोटावर झोपून पुस्तक वाचणे, मोबाईल, लॅपटॉपचा वापर करणे किंवा फक्त झोपणेही पाठ आणि पोटाच्या आरोग्यासाठी घातक (Dangerous to health) आहे.
पोटावर झोपल्यामुळे पाठीच्या कण्याच्या नैसर्गिक बाकात बदल होऊन पाठ आणि मानेची दुखणी उद्भवू शकतात.
सतत पोटावर झोपल्यामुळे शरीरावर अतिरिक्त ताण (Extra stress on the body) येऊन बराच त्रास होऊ शकतो.
पोटावर झोपून मोबाईल/लॅपटॉपचा वापर करणाऱ्यांना पाठीची दुखणी त्रास देऊ शकतात.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.