Photo Story: केस पांढरे होऊ लागलेत? आहारात करा या 9 सुपरफूडचा समावेश | Hair Growth Tips | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hair Growth Tips: केस पांढरे होऊ लागलेत? आहारात करा या 9 सुपरफूडचा समावेश

Hair turning white

Hair Growth Tips: लहान वयात केस पांढरे होणे आजकाल सामान्य झाले आहे. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि धकाधकीची जीवनशैलीमुळे याचा परिणाम केसांवर दिसून येतो. केस पांढरे होणे, तुटणे, गळणे, कोरडेपणा अशा विविध केसांच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागू शकते. मग तुम्ही कितीही उत्पादने वापरली तरी फरक पडणार नाही. अशा परिस्थितीत काही लोक केसांवर ट्रीटमेंट घेण्याचा विचार करतात. पण केसांवर उपचार करणे खूप महाग आणि त्रासदायक असते. परंतु जर तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश असेल तर तुमच्या केसांच्या समस्या दूर होऊ शकतील. (Hair turning white? Include these superfoods in your diet)

1. अक्रोड (Walnut)- NCBI KE च्या मते, ओमेगा-3 फॅटी अॅसिडने समृद्ध अक्रोड केसांच्या वाढीस फायदेशीर असते. त्यातील बायोटिन केस आणि टाळू निरोगी ठेवते. कॉपरमुळे केसांचा रंग एकसमान राहतो आणि ते चमकदार होतात.

2. हिरव्या भाज्या (Green Vegetables)- पालक, काळे, ब्रोकोली यांसारख्या हिरव्या भाज्यांमध्ये लोह, फोलेट, कॅल्शियम, व्हिटॅमिन ई आणि बीटा-कॅरोटीन मुबलक प्रमाणात असतात जे फॉलिकल्स आणि स्काल्प निरोगी ठेवतात.

3. अंडी (Eggs)- अंड्यांमध्ये झिंक, सेलेनियम, सल्फर, लोह आणि प्रथिने यांसारखी खनिजे मुबलक प्रमाणात असतात जी केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात आणि ते निरोगी ठेवतात.

4. बीन्स (Beans)- बीन्स, मसूर यांसारख्या शेंगांमध्ये केसांच्या वाढीसाठी आणि मजबुतीसाठी आवश्यक प्रथिने, लोह, जस्त आणि बायोटिन असतात.

5. ब्राउन तांदूळ (Brown Rice)- बायोटिन ग्रुप बी-कॉम्प्लेक्सच्या पाण्यात विरघळणारे जीवनसत्त्वांनी ब्राउन राईस समृद्ध असतो. ओट्स, शेंगामध्ये देखील बायोटिन असते, जे केस आणि स्काल्प निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहे.

6. बेरी (Berries)- व्हिटॅमिन सी समृद्ध बेरी कोलेजनला चालना देण्यास मदत करतात. शरीरात कोलेजनच्या कमतरतेमुळे केसांच्या समस्या उद्भवतात. कोलेजन हे एक प्रथिन आहे जे केसांसाठी महत्त्वाचा आहे. व्हिटॅमिन सी लोह आणि जस्त शोषण्यासाठी देखील आवश्यक आहे जे निरोगी केसांसाठी देखील आवश्यक आहे.

7. ऑलिव्ह (Olive)- अत्यावश्यक फॅटी ऍसिडसह समृद्ध असलेले व्हिटॅमिन ई देखील खराब झालेल्या केसांचे पोषण करण्यास मदत करते.

8. काकडी (Cucumber)- खनिज सिलिकाचा नैसर्गिक स्रोत जो केसांच्या वाढीसाठी आवश्यक आहे. सिलिका-समृद्ध अन्नाची इतर उदाहरणे म्हणजे आंबा, हिरव्या भाज्या, बीन्स इ.

9. या गोष्टीही महत्त्वाच्या-
स्वतःला नेहमी चांगले हायड्रेटेड ठेवा. दररोज 8-10 ग्लास पाणी प्या. कोंडा टाळा कारण यामुळे केस गळती देखील होऊ शकते. लोह आणि जस्त शोषण्यासाठी तुम्हाला पुरेसे व्हिटॅमिन सी मिळत असल्याची खात्री करा.
शारीरिक आणि मानसिक तणाव दूर ठेवण्यासाठी व्यायाम, योगा आणि ध्यानाचा सराव करा. जंक फूड खाणं टाळा. या टिप्स फॉलो करून आणि हे पदार्थ तुमच्या आहारात समाविष्ट केल्याने तुम्हाला तुमच्या केसांच्या आरोग्यामध्ये फरक जाणवेल.

9. या गोष्टीही महत्त्वाच्या- स्वतःला नेहमी चांगले हायड्रेटेड ठेवा. दररोज 8-10 ग्लास पाणी प्या. कोंडा टाळा कारण यामुळे केस गळती देखील होऊ शकते. लोह आणि जस्त शोषण्यासाठी तुम्हाला पुरेसे व्हिटॅमिन सी मिळत असल्याची खात्री करा. शारीरिक आणि मानसिक तणाव दूर ठेवण्यासाठी व्यायाम, योगा आणि ध्यानाचा सराव करा. जंक फूड खाणं टाळा. या टिप्स फॉलो करून आणि हे पदार्थ तुमच्या आहारात समाविष्ट केल्याने तुम्हाला तुमच्या केसांच्या आरोग्यामध्ये फरक जाणवेल.

go to top