मुंबई - हॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री अँजेलिना (angelina jolie) जोली आज तिचा 46 वा जन्मदिवस (happy birthday) साजरा करत आहे. जगभरात लोकप्रिय असणा-या या अभिनेत्रीला तिच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा दिल्या आहेत. वयाच्या अकराव्या वर्षांपासून मॉडेलिंगला (modeling) सुरुवात करणा-या अँजेलिनाचा चाहतावर्ग मोठा आहे. तिनं आपल्या अभिनयानं वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. केवळ अभिनयच नाही तर सामाजिक कामांमध्येही अँजेलिना कायम अग्रेसर असल्याचे दिसून आले आहे. तिनं एक एनजीओ ही स्थापन केली आहे. (happy birthday angelina jolie bold and beautiful picture of angelina)
अँजेलिना सोशल मीडियावर अॅक्टिव्ह (active on social media) असणारी सेलिब्रेटी आहे. ती नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे फोटो शेअर करुन चाहत्यांची पसंती मिळवत असते.
लहानपणापासून दिग्दर्शक (director) होण्याचं स्वप्न उराशी बाळगणा-या अँजेलिनाच्या फोटोंवरुन तिच्या वयाचा अंदाज बांधता येणार नाही. एवढी ती सुंदर दिसते.
अँजेलिनाच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे झाल्यास तिनं तीन लग्न (3 marraige)केली आहेत. आता ती सिंगल मदर (singal mother) आहे. आणि आपल्या मुलांची काळजी घेत आहे. काही दिवसांपूर्वी तिनं हॉलीवूडचा प्रसिध्द अभिनेता ब्रॅड पिटशी (brad pitt) घटस्फोट घेतला.
तिच्या आणि ब्रॅड पिट्या घटस्फोटाची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली होती. कोर्टानं ब्रॅड आणि अँजेलिनाला त्यांच्या मुलाची जॉईन कस्टडी सोपवली आहे.
1982 मध्ये आलेल्या लुकिंग टू गेट आऊट पासून अँजेलिनानं आपल्या हॉलीवूडमधल्या प्रवासाला सुरुवात केली होती. आता ती हॉलीवूडची सर्वाधिक यशस्वी अभिनेत्री आहे...
सोशल मीडियावर अँजेलिना नेहमीच अॅक्टिव्ह असते. त्यावर ती हॉट फोटोशुट करत असते. त्यालाही तिच्या चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असतो. ती पडद्यावर जेवढी बोल्ड आहे तेवढीच रियल लाईफमध्येही बोल्ड असल्याचे दिसून आले आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.