हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध संगीतकारांपैकी एक असलेले ए.आर रहमान (A R Rahman) आज सिनेविश्वात एका वेगळ्याच टप्प्यावर आहेत.
A R Rahman
नोटांचा बादशाह म्हटल्या जाणाऱ्या रहमान यांच्या गाण्याचं आणि संगीताचं अवघं जग वेडं आहे.A R Rahman
गोल्डन ग्लोब पुरस्कार (Golden Global Award) मिळविणाऱ्या या पहिल्या भारतीय संगीतकाराचा आज वाढदिवस आहे.A R Rahman
1967 मध्ये तामिळनाडूमध्ये जन्मलेला रहमान हे आज 55 वर्षांचे झाले आहेट. आपल्या कर्तृत्वाने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे मूल्य उंचावणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाला वडिलांकडून संगीताचा वारसा लाभला आहे. त्यांचे वडील आर.के. शेखर (R.K Shekhar) मल्याळम चित्रपटांना संगीत द्यायचे.A R Rahman
वयाच्या 11 व्या वर्षापासून संगीतासोबत वेळ घालवणाऱ्या रहमान यांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. 'स्लम डॉग मिलेनियर' (Slumdog Millionaire) या ब्रिटिश भारतीय चित्रपटातील संगीतासाठी तीन ऑस्कर नामांकने (Oscar Nominations) मिळवणारे ए.आर. रहमान हे पहिले भारतीय आहेत.
A R Rahman
एआर रहमाननी 1991 मध्ये स्वतःचे संगीत रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. त्यांना चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम (Manirattnam) यांनी त्यांच्या रोजा चित्रपटासाठी संगीत देण्यासाठी आमंत्रित केले होते. हा चित्रपट म्युझिकल हिट ठरला आणि पहिल्याच चित्रपटात रहमाननी फिल्मफेअर (Filmfare) जिंकला होता.
A R Rahman
वयाच्या 25 व्या वर्षी रहमाननी स्वतःला अपयशी मानले आणि दररोज आत्महत्येचा विचार करायचे.
तेहजीब (Tehjaab), बॉम्बे (Bombay), दिल से (Dil Se), रंगीला (Rangila), ताल (Taal), जीन्स (Jeans), पुकार (Pukar), फिजा (Fiza), लगान (Lagaan), मंगल पांडे (Mangal Pande), स्वदेश (Swades), रंग दे बसंती (Rang De Basanti), जोधा-अकबर (Jodha-Akbar), जाने तू या जाने ना (Jane Tu Ya Jane Na), युवराज (Yuvraj), स्लम डॉग मिलेनियर, गजनी (Gajni) यांसारख्या चित्रपटांना त्यांनी उत्कृष्ठ संगीत दिले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.