कर्करोगाला हरवून मैदानावर जबरदस्त पुनरागमन; किवी स्टारची अफलातून कहाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्करोगाला हरवून मैदानावर जबरदस्त पुनरागमन

Lea Tahuhu

न्यूझीलंडची वेगवान गोलंदाज ली तहुहु आज आपला 30 वा वाढदिवस साजरा करत आहे. या किवी गोलंदाजानं लहान वयात मोठी कामगिरी केलीय.

न्यूझीलंडची वेगवान गोलंदाज ली तहुहु आज आपला 30 वा वाढदिवस साजरा करत आहे. या किवी गोलंदाजानं लहान वयात मोठी कामगिरी केलीय. त्याचबरोबर कर्करोगासारख्या गंभीर आजाराला हरवून तिनं क्रिकेट क्षेत्रात पुन्हा पुनरागमन केलंय.

ली तहुहुनं वयाच्या 21 व्या वर्षी 2011 मध्ये न्यूझीलंडसाठी पदार्पण केलं. यानंतर तिनं 2013 मध्ये देशासाठी पहिला विश्वचषक खेळला. यात तिनं चमकदार कामगिरी केली. तद्नंतर 2018 मध्ये ती केंद्रीय खेळाडूंना मिळालेल्या काही खेळाडूंपैकी एक होती.

कर्करोगाला हरवून यावर्षी इंग्लंड दौऱ्यावर तहुहुनं नेत्रदीपक पुनरागमन केलंय. खरं तर तहुहुच्या पायावर एक लहानशी तीळ होती. त्याचा तिला कोणताही त्रास होत नव्हता, पण ती तीळ काढणं अपेक्षित होतं. नंतर हळूहळू ती तीळ वाढत गेली आणि त्याचा रंग बदलत गेला. ते तीळ काढण्याचं काम डॉक्टरांनी केलं.

तिच्या दुसऱ्या शस्त्रक्रियेपूर्वी त्यांना कळलं की, तिला प्रत्यक्षात त्वचेचा कर्करोग झालंय. त्यानंतर डॉक्टरांनी योग्य वेळी निर्णय घेत, कर्करोग धोकादायक टप्प्यावर पोहोचू दिला नाही. त्यानंतर मात्र, तिला आठ आठवडे अंथरुणावर राहावं लागलं होतं.

सुमारे 18 महिन्यांनंतर ती या वर्षी इंग्लंड दौऱ्यावर परतलीय. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये तिने पाच विकेट्स घेतल्या. तिच्या एकदिवसीय कारकिर्दीतील ही पहिलीच वेळ होती. जेव्हा तिनं पाच बळी मिळवले. यानंतर तिच्या धैर्याचं आणि उत्कटतेचं सर्वत्र कौतुक झालं. तहुहुनं 74 एकदिवसीय सामन्यांमध्ये 81 विकेट घेतल्या आणि 299 धावा केल्या आहेत. तसेच 60 टी-20 सामन्यांत तिनं 52 विकेट्सही मिळवले आहेत.

ली तहुहुच्या आयुष्यात तिची सहकारी खेळाडू आणि पत्नी एमी सदरवॅट हिने महत्वाची भूमिका बजावलीय. प्रत्येक अडचणीत ती तिच्यासोबत असते. या दोघींनी 2017 मध्ये लग्न केलं. गेल्या वर्षी ती एका मुलीची आई बनलीय.

टॅग्स :cricket news today
go to top