sakal

बोलून बातमी शोधा

Happy birthday: 'त्या' चित्रपटांमुळे राधिका नेहमीच राहिली वादात

बॉलीवूडमध्ये bollywood वादग्रस्त म्हणून ज्या अभिनेत्रींची नावं घेतली जातात त्यापैकी एक म्हणजे राधिका आपटे radhika apte. आज तिचा जन्मदिवस आहे. तिनं केवळ बॉलीवूडच नाहीतर हॉलीवूडमध्येही काम केलं आहे. याशिवाय वेगवेगळ्या वेबसीरिजमध्येही ती चमकली आहे. ती एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणूनही प्रसिद्ध आहे. आपल्या प्रभावी अभिनयानं तिनं प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. अनेक चित्रपट महोत्सवांमध्येही तिच्या अभिनयाचे कौतूक झाले आहे. आपल्या परखड स्वभावासाठी राधिका ओळखली जाते. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या राधिकाचा चाहतावर्गही मोठा आहे. अशावेळी तिच्याशी संबंधित अनेक वादग्रस्त गोष्टीही समोर येताना दिसतात. राधिका ही नेहमीच तिच्या काही चित्रपटांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेली दिसून आली आहे.

राधिकाला तिच्या असंख्य फॅन्सनं तिला जन्मदिनाच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या आहेत. तिनंही फॅन्सला धन्यवाद दिले आहेत. त्या फॅन्समध्ये बॉलीवूडमधल्या अनेक सेलिब्रेटींचाही समावेश आहे.

राधिकानं आतापर्यत पार्श्च्ड, रक्तचरित्र, रक्तचरित्र २, माझी द माउंटेन मॅन, शोर इन द सिटी, हंटर, अंधाधून, बदलापूर सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. राधिका ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

राधिका नेहमीच वेगवेगळ्या पोस्ट शेयर करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. राधिकाचा जन्म ७ सप्टेंबर १९८५ मध्ये तामिळनाडू मध्ये झाला.

राधिकानं बॉलीवूडमध्ये येण्याचं मोठं आव्हान स्वीकारुन त्यात प्रसिद्ध अभिनेत्री होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. तिनं २००५ मध्ये बॉलीवूडमध्ये इंट्री केली होती. तिला २०११ मध्ये लोकप्रियता मिळाली. तिनं मराठी, हिंदी, तमिळ, इंग्रजी, बंगाली या भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

आपल्या चित्रपटांमधील बोल्ड सीनमुळे राधिका ही वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. तिचे काही सीन्स तेव्हा लीक झाले होते. त्यामुळे तिला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. मात्र तिनं त्याकडे जास्त लक्ष न देता आपल्या करिअरला फोकस केले होते.

 द वेडिंग गेस्ट आणि पार्श्च्ड मधील काही बोल्ड सीनमुळे राधिका चर्चेत आली होती. त्यामुळे तिला मोठया प्रमाणावर त्रासही सहन करावा लागला होता. तिला काही बोल्ड चित्रपटांची ऑफरही आली होती. अशी चर्चा तेव्हा सोशल मीडियावर होती.