Hardeek Akshaya Wedding: अहा! राणा दा - पाठक बाईंच्या रिसेप्शनचे फोटो तर बघा, निस्ता खर्च!
Hardeek & Akshaya Wedding : 'तुझ्यात जीव रंगला'फेम राणादा आणि पाठक बाई म्हणजेच मराठीतील प्रसिद्ध कलाकार हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी आपल्या प्रेमाबद्दल जाहीर केल्यानंतर ते कधी एकदा लग्नगाठ बांधणार यांची उत्सुकता सर्वांना लागली होती. अखेर त्यांचे लग्न काल 2 डिसेंबर रोजी पुण्यामध्ये अत्यंत दिमाखात पार पडले. या शाही विवाह सोहळ्यानंतर एक डोळे दिपवणारे रिसेप्शन पार पडले.यावेळी मनोरंजन विश्वातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली, तेच ही खास क्षण..
(Hardeek joshi Akshaya naik Wedding royal reception in pune )
''अखेर तुझ्यात जीव रंगलाच'' म्हणत हार्दिक अक्षयाचे लग्न पार पडले.
लग्नानंतर अत्यंत दणक्यात त्यांचे रिसेप्शन झाले. यावेळी हार्दिकचे आई बाबा आणि अक्षयाचे आईबाबा यांनीही आपल्या मुलांसोबत खास फोटो काढले.
या सोहळ्यासाठी हार्दिक अक्षयाने पर्पल कलरची ड्रेसिंग केली होती.
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील सर्व कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली.
तसेच मालिकेत आणि खऱ्या आयुष्यातही अक्षयाला बहीण मानणारा 'बरकत' म्हणजेच अभिनेता अमोल नाईक देखील यावेळी खास लुक मध्ये दिसला.