Tue, March 21, 2023
Hardik Pandya Natasha Wedding : हार्दिक पांड्याने व्हॅलेंटाईन डेला नताशासोबत केले पुन्हा लग्न, पाहा फोटो
Published on : 14 February 2023, 4:53 pm
या दोघांचे अनेक फोटो आता सोशल मीडियावर समोर आले आहेत.
हार्दिकने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत.
ज्यामध्ये हे कपल पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसत आहे.
नताशाने तिच्या लग्नात सुंदर पांढरा गाऊन परिधान केला आहे.
या फोटोंमध्ये हार्दिक काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत होता. ज्यामध्ये तो नेहमीप्रमाणेच डॅशिंग दिसत आहे.
फोटो शेअर करताना हार्दिकने कॅप्शनमध्ये आभार मानले आहेत
"आम्ही तीन वर्षांपूर्वी जी शपथ घेतली होती, ती आम्ही या व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी पुन्हा केली आहे. या उत्सवात मित्र आणि कुटुंबीयांचे प्रेम मिळाल्याने आनंद झाला," असे हार्दिक म्हणाला.
नताशा आणि हार्दिकने दुसरे लग्न केले आहे.
याआधी दोघांनी कोर्ट मॅरेज केले होते.
या दोघांच्या दुसऱ्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे