Health Tips: तांब्याच्या भांड्यातले पाणी पिताना 'या' गोष्टी आठवणीने लक्षात ठेवा...
तांब्याच्या ग्लासेस किंवा बाटलीतून पाणी पिण्याआधी काही गोष्टींची खबरदारी घ्या.जुन्या काळातील अनेक लोक आपल्या किचनमध्ये तांब्याच्या भांड्यांचा वापर जास्त प्रमाणात करायचे.
तांब हा एकमेव असा धातू आहे की ज्यात, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंधीत करणारे गुणधर्म असतात. आयुर्वेदानुसार या धातूचा वापर करणे उपयुक्त मानले जाते.
तांब्याच्या भांड्यात कमीत कमी आठ तास ठेवलेले पाणी प्यायल्यास शरीरातील विविध अपायकारक घटक बाहेर फेकण्यास मदत होते.
शरीरातील अशुद्धी दूर झाल्याने संपूर्ण शरीर निरोगी राहण्यास मदत होते.
आपण जर वारंवार पाणी पिण्यासाठी तांब्याच्या भांड्यांचा वापर करत असाल तर ते आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
आपल्या शरीरात तांब्यातील काही विषारी घटक वारंवार जाऊन मळमळ, चक्कर येणे, ओटीपोटात दुखणे, यकृत व मूत्रपिंड निकामी होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
लिंबू आणि मधाचे पाणी तांब्याच्या भांड्यातून पिऊ नका असे केल्यास पोटात दुखणे, गॅस, उलटया होणे यांसारख्या समस्या उद्भवतात
तांब्याची बाटली किंवा ग्लास यांची स्वच्छता ठेवा. प्रत्येक वेळी वापरल्यानंतर किमान स्वच्छ पाण्याने धुणे गरजेचे आहे.