Hema Malini Birthday: ड्रीम गर्लचे हे सुपरहिट चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

सत्तरच्या दशकात अभिनयाने वेड लावणारे चित्रपट...
Hema Malini Birthday
Hema Malini BirthdayEsakal
Updated on

हेमा मालिनी ने सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.एक दोन दशक नव्हे तर जवळपास चार दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी सिने जगतात अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्याचे असेच काही हिट चित्रपट जे हेमाच्या करिअरमधील महत्वाचे ठरले आणि तिचे चहाते अजूनही आवडीने पाहिले जातात.

जॉनी मेरा नाम:
 हेमा मालिनी यांना 'जॉनी मेरा नाम' या चित्रपटाने ओळख मिळाली. हेमा मालिनी आणि  अभिनेता देवानंद यांच्या मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटानतंर हेमा आणि देवानंद या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला.
जॉनी मेरा नाम: हेमा मालिनी यांना 'जॉनी मेरा नाम' या चित्रपटाने ओळख मिळाली. हेमा मालिनी आणि अभिनेता देवानंद यांच्या मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटानतंर हेमा आणि देवानंद या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला.
 ‘अंदाज’ :
1971 मध्ये आलेला ‘अंदाज’ ह्या रोमँटिक ड्रामा असलेल्या चित्रपटाने हेमा मालिनीला एक वेगळीच ओळख दिली. यात शम्मी कपूर , हेमा मालिनी , राजेश खन्ना आणि सिमी गरेवाल यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटात हेमा मालिनी यांनी राजेश खन्नाच्या प्रियकराची भूमिका साकारली होती. याच चित्रपटाने " जिंदगी एक सफर है सुहाना " हे सदाबहार गीत दिले.
‘अंदाज’ : 1971 मध्ये आलेला ‘अंदाज’ ह्या रोमँटिक ड्रामा असलेल्या चित्रपटाने हेमा मालिनीला एक वेगळीच ओळख दिली. यात शम्मी कपूर , हेमा मालिनी , राजेश खन्ना आणि सिमी गरेवाल यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटात हेमा मालिनी यांनी राजेश खन्नाच्या प्रियकराची भूमिका साकारली होती. याच चित्रपटाने " जिंदगी एक सफर है सुहाना " हे सदाबहार गीत दिले.
‘सीता और गीता:
1972 मध्ये ‘सीता और गीता’ या चित्रपटात हेमा मालिनी सीता और गीताच्या दुहेरी भूमिकेत दिसली.रमेश सिप्पीने दिग्दर्शित या चित्रपटाच्या यशानंतर हेमा मालिनी प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. ह्या भूमिकेसाठी हेमा मालिनीला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. विषेश म्हणजे या चित्रपटासाठी मुमताज ही सिप्पींची पहिली पसंती होती.
‘सीता और गीता: 1972 मध्ये ‘सीता और गीता’ या चित्रपटात हेमा मालिनी सीता और गीताच्या दुहेरी भूमिकेत दिसली.रमेश सिप्पीने दिग्दर्शित या चित्रपटाच्या यशानंतर हेमा मालिनी प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. ह्या भूमिकेसाठी हेमा मालिनीला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. विषेश म्हणजे या चित्रपटासाठी मुमताज ही सिप्पींची पहिली पसंती होती.
‘शराफत’:
धर्मेंद्र आणि हेमाची जोडी किती प्रसिद्ध होती हे काही वेगळं सांगायची गरज नाही. 1970  मध्ये प्रर्दशित झालेल्या ‘शराफत’ याचित्रपटातुन ह्या जोडीने मोठ्या पडद्यावर जादु केली. पुढे हि जोडी खुप गाजली.
‘शराफत’: धर्मेंद्र आणि हेमाची जोडी किती प्रसिद्ध होती हे काही वेगळं सांगायची गरज नाही. 1970 मध्ये प्रर्दशित झालेल्या ‘शराफत’ याचित्रपटातुन ह्या जोडीने मोठ्या पडद्यावर जादु केली. पुढे हि जोडी खुप गाजली.
‘शोले’:
 1975 मध्ये प्रदर्शित झालेला ‘शोले’ ह्या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड बनवले. मुंबईच्या मिनर्व्हा चित्रपटगृहात हा तब्बल २८६ आठवडे तळ ठोकून होता. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमामालिनी, संजीव कुमार व अमजदखान यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या.या चित्रपटातील  हेमाने निभावलेली बसंतीची भूमिका अजूनही प्रसिद्ध आहे.
‘शोले’: 1975 मध्ये प्रदर्शित झालेला ‘शोले’ ह्या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड बनवले. मुंबईच्या मिनर्व्हा चित्रपटगृहात हा तब्बल २८६ आठवडे तळ ठोकून होता. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमामालिनी, संजीव कुमार व अमजदखान यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या.या चित्रपटातील हेमाने निभावलेली बसंतीची भूमिका अजूनही प्रसिद्ध आहे.
सत्तरच्या दशकात, हेमा मालिनी केवळ ग्लॅमरस भूमिका करतात या आरोपाला फाटा देत त्यांनी परंतु 1975 मध्ये खुशबू, 1977 मध्ये किनारा आणि 1979 साली प्रदर्शित झालेल्या मीरा यांसारख्या चित्रपटांमध्ये गंभीर भूमिका करून समीक्षकांचे तोंड कायमचे बंद केले.
सत्तरच्या दशकात, हेमा मालिनी केवळ ग्लॅमरस भूमिका करतात या आरोपाला फाटा देत त्यांनी परंतु 1975 मध्ये खुशबू, 1977 मध्ये किनारा आणि 1979 साली प्रदर्शित झालेल्या मीरा यांसारख्या चित्रपटांमध्ये गंभीर भूमिका करून समीक्षकांचे तोंड कायमचे बंद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com