Mango Harmful Effects: आंबा खाल्ल्यानंतर चुकूनही खाऊ नका या 5 गोष्टी; ठरू शकतं हानिकारक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबा खाल्ल्यानंतर चुकूनही खाऊ नका या 5 गोष्टी; ठरू शकतं हानिकारक

Harmful Effects of Mango

Harmful Effects of Mango: उन्हाळा आला की, फळांचा राजा आंबा बाजारात सर्वत्र उपलब्ध होतो. आंबा बहुतेकांना खूप आवडतो, काहीजण तर रात्रंदिवस आंबं खात असतात. भात, रोटी किंवा पराठेही अनेक ठिकाणी आंब्यासोबत खाल्ले जातात. तुम्हीही आंब्याचे मोठे चाहते असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आंबा खाल्ल्यानंतर लगेच काही गोष्टींचे सेवन करणे टाळा, जेणेकरून आरोग्याला हानी पोहोचणार नाही आणि तुम्हाला संपूर्ण हंगामात आंब्याचा आनंद घेता येईल. आंबा खाल्ल्यानंतर काही गोष्टी टाळल्या नाहीत तर त्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात, हे फार कमी लोकांना माहिती असेल. चला तर मग जाणून घेऊया. (Here are 5 things you shouldn't accidentally eat after eating mango; Can be harmful)

1. दही (Curd) -आंबा खाल्ल्यानंतर लगेच दही सेवन करणे देखील योग्य नाही. कारण आंबा आणि दही मिळून कार्बन डायऑक्साइड तयार होतो, ज्यामुळे पोटाचा त्रास होऊ शकतो.

2. आंब्यानंतर थंड पेय पिऊ नका (Cold Drinks)- काही खाल्ल्यानंतर लोकांना अनेकदा तहान लागते. विशेषतः गोड खाल्ल्यानंतर...तहान लागल्यावर पाणी पिणे ठीक आहे, पण काही लोक कोल्ड्रिंक्स पितात, जे शरीरासाठी हानिकारक आहे. कोल्ड्रिंक्समध्ये असलेला सोडा आणि साखर दोन्ही शरीरासाठी हानिकारक असतात. आंब्यामध्येही नैसर्गिकरित्या साखरेचे प्रमाण जास्त असते आणि त्यानंतर कोल्ड्रिंक प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका असतो.

3. पाणी (Water)- खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे योग्य मानले जात नाही. खाल्ल्यानंतर तहान नक्कीच लागते, पण काही वेळ थांबून पाणी पिणे चांगले. आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास पोटाला ते पचण्यास त्रास होतो. त्यामुळे गॅस, छातीत जळजळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

4. तिखट आणि मसालेदार अन्नापासून दूर राहा (Spicy Food)- साधारणपणे उन्हाळ्यात अन्न खाल्ल्यानंतर लोकांना आंबा खायला आवडतो. मात्र, ही सवय योग्य नाही. तिखट आणि मसालेदार जेवणानंतर आंबा खाल्ल्याने पोटदुखी किंवा छातीत जळजळ होऊ शकते. यासोबतच मुरुमांसारख्या समस्याही सुरू होऊ शकतात.

5. कारले (Bitter Gourd) - जेवताना जर तुमच्या ताटात कारले आणि आंबा दोन्ही असतील तर थोडा वेळ थांबा. कारण कारले आणि आंबा एकत्र खाल्ल्याने पोटाचा त्रास होऊ शकतो. आंबा खाल्ल्यानंतर लगेच कारले खाल्ल्याने उलट्या, मळमळ आणि श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो.

टॅग्स :Mango Fruithealth news
go to top