sakal

बोलून बातमी शोधा

Relationship Tips: नात्यासाठी सायलेंट किलर ठरू शकणाऱ्या पाच गोष्टी

Healthy Long Term Relationship Tips

Relationship Tips: अलीकडच्या बदललेल्या काळात नात्यात येण्यापेक्षा ते टिकवणे जास्त कठीण झाले आहे, मग नाते प्रेमाचं (Love Relation) असो वा लग्नानंतरच (Marriage). नातं टिकवायचा असेल तर विश्वास, वेळ आणि मेहनत हे सर्वात महत्त्वाचे मानले जाते. काही वेळा अनेक प्रयत्नांनंतरही नात्यात वाद निर्माण होतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे विचारांचे वेगळेपण. याशिवाय अनेकवेळा चुकांची पुनरावृत्ती करणे हे सुद्धा नातं कमकुवत होण्यासाठी कारणीभूत ठरतं. तुम्हाला तुमचं नातं टिकवायचं असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. (Here are five things that can be a silent killer for a relationship)

1. एखाद्या गोष्टीवर अडून राहणं-  प्रत्येक जोडप्यात भांडण होत असते. ही गोष्ट सामान्य आहे, परंतु जेव्हा तुम्ही रागाच्या भरात बोलल्या जाणार्‍या गोष्टींवर अडून राहता, तेव्हा भांडणे परिणाम वाईट परिणाम होऊ शकतात. याशिवाय, जेव्हा भांडण होऊनही तुम्ही समस्या सोडवू शकत नाही, तेव्हा तुमच्यातील प्रेम कमी होऊ लागते.(Healthy Long Term Relationship Tips)

2. दयाळूपणाकडे दुर्लक्ष करणे- भांडणात काहीही झाले तरी चालेल, पण तुम्ही मूलभूत गोष्टींची काळजी घेणे कधीच थांबवू नका, कारण प्रेमळ नाते असण्यासोबतच तुमचे तुमच्या जोडीदारासोबत सहानुभूतीचं नातं देखील असायला हवं. भांडणानंतरही जोडीदाराला अन्न खाण्यास किंवा त्यांच्या लहान गरजांची काळजी घेण्यास सांगा. प्रेमासोबत मनाची काळजी घेणेही खूप गरजेचे आहे.

3. सेक्स नाकारणे- सेक्स ही केवळ तुमची इच्छाच नाही तर तुमच्या दोघांमधील बंधही मजबूत करते. जर जोडीदारांपैकी एकाने दुसर्‍याला वेळोवेळी लैंगिक संबंध ठेवण्यास मनाई केली तर, नातेसंबंध संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

4. तुमच्या भावना शेअर न करणे- तुमच्या मनात अनेक गोष्टी असतील आणि तुम्ही त्या तुमच्या जोडीदाराला सांगू शकत नसाल तर हे तुमचे नाते मजबूत नसल्याचं एक लक्षण आहे. त्याच वेळी, तुमच्या या सवयीमुळे तुमच्या जोडीदाराला असे वाटेल की तुम्ही त्यांच्यापासून अंतर राखत आहात. कधीकधी, एक ऐकून घेणे आणि प्रत्येक गोष्टीचे उत्तर न देणे पुरेसे असते. या गोष्टी तुमच्या जोडीदाराशी जरूर बोला.

5. शब्द किंवा चुकांची पुनरावृत्ती- पुन्हा-पुन्हा सॉरी म्हणत त्याच चुका करत राहिलो तर तुमच्या माफीला काही अर्थ उरणार नाही. असे केल्याने तुमचा स्वाभिमान देखील कमी होऊ लागतो. यामुळे तुमचा पार्टनर तुमच्यावर निराश होतो. या सवयीने हळूहळू नाते संपुष्टात येऊ लागते.