- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- मनोरंजन
- सप्तरंग
- YIN युवा
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- धन की बात
- क्रीडा
- आणखी..
- करिअर-नोकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- Myfa
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- दैनंदिन भविष्य
- साप्ताहिक भविष्य
- संपादकीय
- विज्ञान तंत्रज्ञान
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- ब्लॉग
- फुड
- आरोग्य
- काही सुखद
- प्रतिक्रिया-युनियन-बजेट
- वुमेन्स-कॉर्नर
- अर्थसंकल्प 2022
Honda Cars India:स्वस्तात कार खरेदीची सुवर्णसंधी; ही कंपनी देत आहे बंपर डिस्काउंट


Heavy Discount on Honda Cars: होंडा कार्स इंडियाने (Honda Cars India) मे महिन्यात त्यांच्या वाहनांवर सूट जाहीर केली आहे. विक्री वाढवण्यासाठी कंपनीने या महिन्यात कार विक्रीवर 33,158 रुपयांपर्यंतचा सूट जाहीर केली आहे. कंपनीची ही ऑफर 31 मे 2022 पर्यंत किंवा स्टॉक संपेपर्यंत लागू आहे.

1. होंडा जाझ (Honda Jazz)- होंडा जाझवर 33,158 रुपयांची सर्वाधिक सूट उपलब्ध आहे. यामध्ये 10,000 रुपयांपर्यंत रोख सूट किंवा 12,158 रुपयांपर्यंतच्या FOC अॅक्सेसरीजचा समावेश आहे. याशिवाय, कार एक्सचेंजवर 5,000 रुपयांची सूट, 7,000 रुपयांचा कार एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांचा लॉयल्टी बोनस आहे. याशिवाय कंपनी 4,000 रुपयांची कॉर्पोरेट सूटही देत आहे.

2. होंडा सिटी (पाचवी पिढी) (Honda City-fifth-generation)- होंडा सिटीवर 30,396 रुपयांपर्यंतचे फायदे उपलब्ध आहेत. यामध्ये 5,000 रुपयांपर्यंत रोख सूट किंवा 5,396 रुपयांपर्यंत मोफत (FOC) अॅक्सेसरीजचा समावेश आहे. तुम्ही एक्सचेंजवर रु.5,000 ची सूट देखील घेऊ शकता. याशिवाय, होंडा ग्राहकांना 5,000 रुपयांचा लॉयल्टी बोनस आणि 7,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळू शकतो. याशिवाय, कंपनी 8,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देखील देत आहे.

3. होंडा डब्ल्यू आर- व्ही (Honda WR-V)- कंपनी Honda WR-V वर 26,000 रुपयांपर्यंतचे फायदे देत आहे. यामध्ये 10,000 रुपयांची एक्सचेंज सूट आणि 4,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे. Honda ग्राहकांना 5,000 रुपयांचा लॉयल्टी बोनस आणि 7,000 रुपयांचा Honda कार एक्सचेंज बोनस देखील मिळू शकतो.

4. होंडा सिटी (चौथी पिढी) (Honda City-fourth-generation)- कंपनी चौथ्या पिढीच्या होंडा सिटीवर 20,000 रुपयांपर्यंतचे फायदे देखील देत आहे. Honda च्या ग्राहकांना 5,000 रुपयांचा लॉयल्टी बोनस आणि Rs 7,000 चा Honda कार एक्सचेंज बोनस देखील मिळू शकतो. तसेच, ग्राहक या महिन्यात रु.8,000 पर्यंत कॉर्पोरेट सूट घेऊ शकतात.

5. होंडा अमेझ (Honda Amaze)- Honda Amaze वर 9,000 रुपयांपर्यंतचा सर्वात कमी फायदा दिला जात आहे. यामध्ये 5,000 रुपयांचा ग्राहक लॉयल्टी बोनस आणि 4,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे. या मॉडेलवर एक्सचेंज बोनस दिला जात नाही.

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.