Photo Story: IAS टीना डाबीचा आज विवाह! मराठमोळ्या डॉ. प्रदीप गावंडेसोबत सात फेरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IAS टीना डाबीचा आज विवाह! मराठमोळ्या डॉ. प्रदीप गावंडेसोबत सात फेरे

Tina Dabi- pradeep Gawande Wedding

Tina Dabi- Pradeep Gawande Wedding: आयएएस टॉपर टीना डाबी (Tina Dabi) आज दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहे. डॉक्टर प्रदीप गावंडे यांच्यासोबत टीना डाबी लग्नगाठ बांधणार असून या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. जयपूरमधील एका हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे. पाहुण्यांच्या स्वागतासाठी विशेष व्यवस्थाही करण्यात आली आहे. या लग्नात महाराष्ट्र, मध्य प्रदेशासोबतच देशभरातील नामांकित सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. या लग्नासाठी डाबी आणि गावंडे कुटुंबीय खूप उत्साहित आहेत. या विवाहसोहळ्यासाठी काय खास तयारी करण्यात आली आहे, जाणून घेऊया...

आयएएस टॉपर टीना डाबी आज डॉक्टर प्रदीप गावंडे यांच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे.  जयपूरमधील एका हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे.

हॉटेलला फुलांनी आणि विद्युत रोषणाईने पूर्णपणे सजवलेले आहे. येणाऱ्या पाहुण्यांच्या निवासाचीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. महिला पाहुण्यांसाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. टीना आणि प्रदीपचे लग्न खूप हाय प्रोफाईल मानले जात असल्याने त्याची तयारीही जोरदार झाली आहे.

लग्नात पाहुण्यांना राजस्थानी खाद्यपदार्थासोबत चायनीज, पंजाबी, मराठी, गुजराती पदार्थही दिले जाणार आहेत. याशिवाय फास्ट फूडपासून ते चविष्ट पदार्थांचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोतपासून अनेक केंद्रीय मंत्रीही लग्नाला पोहोचणार आहेत. याशिवाय अनेक वरिष्ठ अधिकारीही सहभागी होणार आहेत.

समोर आलेल्या कार्डनुसार, रिसेप्शन हॉटेल हॉलिडे इनमध्ये होणार आहे. हॉटेलच्या अधिकृत वेबसाइट ihg नुसार, हे हॉटेल जयपूरच्या रेल्वे स्टेशन, बस स्टँड आणि विमानतळापासून काही मिनिटांच्या अंतरावर आहे.

प्रदीप गावंडे हे महाराष्ट्रातील मराठी कुटुंबातील आहेत. IAS टीना डाबी आणि प्रदीप गावंडे कोर्ट मॅरेज किंवा मराठी रितीरिवाजाने लग्न करू शकतात.