sakal

बोलून बातमी शोधा

PHOTO : वय किरकोळ आकडा ओ! काका वयाच्या 64 व्या वर्षी 75 किमी धावल्यात

kolhapur

फुलेवाडी : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त महिपती शंकर संकपाळ या ६४ वर्षीय धावपटूने सलग ७५ किलोमीटर धावण्याचा विक्रम केला. ऐतिहासिक रंकाळा तलावाला सतरा प्रदक्षिणा घालत ७५ किलोमीटर अंतर ९ तास ९ मिनिटे २९ सेकंदात पूर्ण केले. जरगनगर येथील नंदनवन कॉलनीत राहत असलेले संकपाळ हे एमएसईबीमध्ये असिस्टंट इंजिनिअर होते.

कोल्हापूर पोलिस दलातर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तीन दिवसांत ७५ किलोमीटर अंतर धावणाऱ्यास प्रशस्तीपत्र देण्याचे जाहीर केले होते. यातूनच प्रेरणा घेऊन स्वातंत्र्यदिनीच ७५ किलोमीटर अंतर धावण्याचा निर्धार संकपाळ यांनी केला. त्यांना सहकारी मित्रांनी प्रोत्साहन दिले.

१४ ऑगस्टच्या रात्री ठीक बारा वाजता रंकाळा चौपाटी येथे धावपटू मित्रांसमवेत राष्ट्रगीत म्हणून उपक्रमात सुरुवात केली. यावेळी कोल्हापूर वॉकर्स असोसिएशनचे बाळासाहेब भोगम, रघुनाथ लाड, धोंडिराम चोपडे, परशुराम नांदवडेकर, नाना गवळी, अजित मोरे, उदय गायकवाड, राजेश पाटील, अविनाश बोकील, उदय महाजन, रावसाहेब सूर्यवंशी आदींनी धावत रंकाळ्याला दोन- तीन प्रदक्षिणा घालत संकपाळ यांना साथ देत प्रोत्साहन दिले.

नऊ तास नऊ मिनिटे २९ सेकंदांत ७५ किलोमीटरचे अंतर पार केल्यानंतर भारत माता की जय, वंदे मातरम, अशा घोषणा देत संकपाळ यांना सहकाऱ्यांनी उचलून घेऊन जल्लोष केला. रंकाळाप्रेमींच्या वतीने त्यांचा सत्कार केला.

वयाच्या ४५ वर्षापासून संकपाळ यांनी आरोग्यासाठी धावण्याचा व्यायाम सुरू केला. प्रौढाच्या स्पर्धेत भाग घेऊ लागले. आजअखेर त्यांनी २१ किलोमीटर व ४२ किलोमीटर स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, मुंबई पुणे, बेंगलोर येथील मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेऊन यश मिळविले आहे.

संकपाळ यांनी तीन वर्षांपूर्वी ६१ व्या वाढदिवसादिवशी ६१ किलोमीटर अंतर धावण्याचा निर्धार केला होता; परंतु ते ५२ किलोमीटरच अंतर धावू शकले. त्यावेळी झालेल्या चुका सुधारत त्यांनी हे ७५ किलोमीटर अंतर पार केले आणि त्यांचे यावेळी स्वप्न पूर्ण झाले.