Women's Day : सुदृढ आरोग्यासाठी महिलांनी लक्षात ठेवाव्या या १० गोष्टी

Women's Day : सुदृढ आरोग्यासाठी महिलांनी लक्षात ठेवाव्या या १० गोष्टी
Updated on

महिला आज सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. पण ही आघाडी सांभाळताना त्यांनी आरोग्यसंपन्न राहणे गरजेचे आहे. पण काही महिला स्वत:च्या तब्येतीकडे दुर्लक्ष करत अनेक आघाड्यांवर लढत असतात. पण त्यांनी स्व:तच्या तब्येतीकडे जास्त लक्ष देणे गरेजेचे आहे. तरंच त्या अधिक मोठा पल्ला गाठू शकतील. चांगला आहार, नियमित व्यायाम, ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबर काही गोष्टी केल्याने त्या त्यांचे आरोग्य सुदृढ ठेवू शकतील. त्यामुळे महिलांनी सुदृढ आरोग्यासाठी या १० गोष्टी लक्षात ठेवाव्या.

१) तणाव कमी करा:  महिलांना अनेक कामांचा प्रचंड तणाव असतो. ताण घेतल्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर दिसायला लागतो. घरची जबाबदारी, ऑफिसच्या कामाचा ताण प्रत्येकीला असतो. पण ताण घेतल्याने तब्येतीवर परिणाम होतो. तणाव घेतल्याने गर्भारपणावर परिणाम, डिप्रेशन, अस्वस्थता, हृदयरोग होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे हा स्ट्रेस कमी करण्यासाठी महिलांनी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी नियमित योगासने, मेडिटेशन करणे गरजेचे आहे.

२) जास्तीत जास्त पाणी प्या- आरोग्य सुदृढ राखण्यासाठी शरीर हायड्रेट ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी शरीरात जवळपास ६० टक्के पाण्याचे प्रमाण असावे. शरीरातल्या प्रत्येक अवयवाचे काम चांगले होण्यासाठी पाणी गरजेचे असते. तसेच जास्त पाणी प्यायल्याने त्वचा ही चांगली होते. त्यामुळे महिलांनी शरीराला गरजेचे असेल तेवढे पाणी पिणे गरजेचे आहे.
२) जास्तीत जास्त पाणी प्या- आरोग्य सुदृढ राखण्यासाठी शरीर हायड्रेट ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी शरीरात जवळपास ६० टक्के पाण्याचे प्रमाण असावे. शरीरातल्या प्रत्येक अवयवाचे काम चांगले होण्यासाठी पाणी गरजेचे असते. तसेच जास्त पाणी प्यायल्याने त्वचा ही चांगली होते. त्यामुळे महिलांनी शरीराला गरजेचे असेल तेवढे पाणी पिणे गरजेचे आहे. Sakal
३) रात्री- ७ ते ८ तास झोप घ्या- पुरेशा प्रमाणात झोप घेणे शरीरासाठी फायद्याचे असते. महिलांना घरातील कामे, मुलांची शाळा, अभ्यास यामुळे पुरेशी झोप मिळत नाही. मुलांसाठी त्यांना अनेकदा रात्री जागावेही लागते. त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे महिलांनी योग्य नियोजन करून ७ ते ८ तासांची झोप घेणे गरजेचे आहे.

४) पौष्टीक पदार्थ खा - तेलकट, तुपकट पदार्थ खाल्ल्याने त्याचा तुमच्या शरीरावर परिणाम होतो. त्यामुळे पुरूषांबरोबरच महिलांनीही आहारात पौष्टीक पदार्थांचा समावेश केला पाहिजे. ताजी फळं, भाज्या, कडधान्य, ब्राऊन राईस, ओट्स आदी खाद्यपदार्थ खाल्ल्याने फायदा होईल.

५)  तुमच्या शरीराचे ऐका- चांगल्या आरोग्यासाठी आपल्या शरीराचे ऐकावे. तुमचे शरीर खूप थकले आहे, किंवा काही समस्या आहेत, असा संकेत तुमचे शरीर देते.  अशावेळी शरीराला योग्य पोषण मिळणे गरजेचे आहे. जर तुम्ही योग्य वेळी पुरेश्या प्रमाणात खाल्ले नाहीत तर त्यामुळे त्याचा तुमच्या शरीरावर परिणाम होणार आहे. अशावेळी शरीराला काय आवश्यक आहे त्याचा विचार करा.
५) तुमच्या शरीराचे ऐका- चांगल्या आरोग्यासाठी आपल्या शरीराचे ऐकावे. तुमचे शरीर खूप थकले आहे, किंवा काही समस्या आहेत, असा संकेत तुमचे शरीर देते. अशावेळी शरीराला योग्य पोषण मिळणे गरजेचे आहे. जर तुम्ही योग्य वेळी पुरेश्या प्रमाणात खाल्ले नाहीत तर त्यामुळे त्याचा तुमच्या शरीरावर परिणाम होणार आहे. अशावेळी शरीराला काय आवश्यक आहे त्याचा विचार करा.esakal
६) दररोज किमान २० ते ३० मिनिटं चाला- तब्येत चांगली राहावी यासाठी महिलांनी दररोज जीमला जावेच असे काही नाही. तुम्ही दररोज किमान २० ते ३० मिनीटं चालल्यानेही तुम्हाला एनर्जी मिळू शकते. पण जर तुमच्याकडे पुरेसा वेळ असेल तर, कार्डियो, वेट ट्रेनिंग, घरी वर्कआउट आदी प्रकार तुम्ही करू शकता.
६) दररोज किमान २० ते ३० मिनिटं चाला- तब्येत चांगली राहावी यासाठी महिलांनी दररोज जीमला जावेच असे काही नाही. तुम्ही दररोज किमान २० ते ३० मिनीटं चालल्यानेही तुम्हाला एनर्जी मिळू शकते. पण जर तुमच्याकडे पुरेसा वेळ असेल तर, कार्डियो, वेट ट्रेनिंग, घरी वर्कआउट आदी प्रकार तुम्ही करू शकता. esakal
७) व्हिटॅमिन, मिनरल्सयुक्त पदार्थ खा- पुरूषांपेक्षा महिलांच्या शरीरात व्हिटॅमिन्स, मिनरल्स कमी प्रमाणात असतात.  त्यामुळे महिलांनी आहारात व्हिटॅमिन्स, मिनरल्सयुक्त पदार्थ खाल्ले पाहिजेत. यामुळे भविष्यात त्यांना आजाराचा सामना करावा लागणार नाही. महिलांनी रोजच्या आहारात कॅल्शिअम, व्हिटॅमिन डी, फोलेट, आर्यन, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमीन बी १२, मॅग्नेशिअमयुक्त पदार्थ अधिक प्रमाणात खावेत.

८) फायबरचा समावेश करा- पचन, त्वचेच्या समस्या, आणि पोटाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी फायबरयुक्त पदार्थांचा समावेश आहारात करावा. त्यासाठी फायबरयुक्त भाज्या, धान्य खाणे अतिशय चांगले.
८) फायबरचा समावेश करा- पचन, त्वचेच्या समस्या, आणि पोटाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी फायबरयुक्त पदार्थांचा समावेश आहारात करावा. त्यासाठी फायबरयुक्त भाज्या, धान्य खाणे अतिशय चांगले. esakal
९) दरवर्षी डॉक्टरांची भेट घेऊन आरोग्य चाचणी करा- काही तज्ज्ञांनुसार महिलांनी दरवर्षी डॉक्टरांकडे जाऊन आरोग्यचाचणी करून घेणे गरेजेचे आहे. तुमचे वय २१ वर्षांच्या पुढे असेल तर तीन वर्षांनी सर्व्हायवल कॅंन्सरची चाचणी करून घेणे गरजेचे आहे. तुमचे वय ३० ते ६५ दरम्यान असेल दर पाच वर्षांनी पॅप टेस्ट आणि एचपीव्ही चाचणी करून घेणे गरजेचे आहे.
९) दरवर्षी डॉक्टरांची भेट घेऊन आरोग्य चाचणी करा- काही तज्ज्ञांनुसार महिलांनी दरवर्षी डॉक्टरांकडे जाऊन आरोग्यचाचणी करून घेणे गरेजेचे आहे. तुमचे वय २१ वर्षांच्या पुढे असेल तर तीन वर्षांनी सर्व्हायवल कॅंन्सरची चाचणी करून घेणे गरजेचे आहे. तुमचे वय ३० ते ६५ दरम्यान असेल दर पाच वर्षांनी पॅप टेस्ट आणि एचपीव्ही चाचणी करून घेणे गरजेचे आहे. Sakal media
१०) नेहमी आनंदी राहा- महिलांनी कायम आनंदी आणि सकारात्मक राहणे गरजेचे आहे. कुठलीही जबाबदारी निभावताना त्यांना कुटूंबाकडून ताकद मिळणे गरेजेचे आहे. ती मिळाली की त्या अतिशय आनंदाने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com