IPL 2022: इंडियन प्रीमियर लीगमध्ये 23 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभत केला. आरसीबीने केवळ 68 धावा केल्या प्रत्युत्तरात हैदराबाद संघाने हे लक्ष्य केवळ 8 षटकांत पार केले. आरसीबीच्या विजयाने चाहते खूश होते, त्याचप्रमाणे संघाची ऑनर काव्या मारन ही खूप आनंदी दिसत होते.(Kaviya Maran Dance Video)
सनरायझर्स हैदराबादच्या शनिवारी झालेल्या सामन्यात काव्या मारन स्टँडमध्ये डान्स करताना दिसली.
सनरायझर्स हैदराबाद संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सातत्याने विकेट घेत असताना ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
काव्या मारन सतत सेलिब्रेट करत होती, त्यावेळी तिला मैदानाच्या मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आले होते. त्यानंतर ती हसली आणि तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.
काव्या मारनचे फोटो आणि तिच्या प्रतिक्रियांचे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच ट्रेंडमध्ये असतात. सामन्याव्यतिरिक्त, ती आयपीएलच्या मेगा लिलावातही संघाच्या रणनीतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.
सामन्यात सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय अचूक ठरला आणि संघाने सातत्याने बंगळुरूच्या विकेट्स मिळवल्या.
हैदराबादने बेंगळुरूला 68 धावांत गुंडाळले. आयपीएलच्या इतिहासातील आरसीबीसाठी ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या होती.
सनरायझर्स हैदराबाद संघ आता पॉइंट टेबलमध्ये नंबर 2 वर पोहोचला आहे. हैदराबादने या मोसमात आतापर्यंत पाच विजय मिळवले आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.