IPL Auction: स्टार 8 खेळाडू ज्यांना फ्रेंचायजीने दिलाय डच्चू| IPL Auction 8 Star Players Who Released By Franchises | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL Auction: स्टार 8 खेळाडू ज्यांना फ्रेंचायजीने दिलाय डच्चू!

IPL Auction 8 Star Players Who Released By Franchises

बंगळुरू: यंदाचा आयपीएल लिलाव (IPL Auction 2022) अवघ्या काही दिवसांवर आला आहे. बंगळुरूमध्ये 12 आणि 13 फेब्रुवारीला होणाऱ्या या लिलावात 10 संघ सहभागी होणार आहेत. हा खऱ्या अर्थाने मेगा असा लिलाव (IPL Mega Auction 2022) असणार आहे कारण सगळ्या संघांना आपली संघबांधणी पुन्हा नव्याने करावी लागणार आहे. जुन्या 8 संघांना फक्त 4 खेळाडू रिटेन करण्याची मुभा होती. काही फ्रेंचायजींनी 3 खेळाडू रिटेन केले आहेत. पंजाब किंग्जने तर फक्त 2 खेळाडू रिटेन (Retain) केले आहेत. बाकीचे सर्व लिलावात रिलीज केले. त्यामुळे लिलावात अनेक स्टार खेळाडू बोली लागण्याच्या प्रतिक्षेत असणार आहेत. काही संघांनी तर त्यांचे स्टार खेळाडू लिलावात रिलीज केल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले. यातील काही खेळाडूंना अहमदाबाद टायटन्स आणि लखनौ सुपरजायंट या दोन नव्या संघांनी आपल्या संघात सामावून घेतले आहे. मात्र या फ्रेंचायजींकडून डच्चू मिळालेल्या या 8 स्टार खेळाडूंपैकी काहींवर आता लिलावात उतरण्याची वेळ आली आहे. (IPL Auction 8 Star Players Who Released By Franchises)

मुंबईने टाकलेला हार्दिक पांड्या : हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) मुंबईकडून आतापर्यंत 92 सामने खेळले. त्यात 27.33 च्या सरासरीने 1476 धावा केल्या. मात्र त्याला मुंबईने धक्कादायकरित्या रिलीज केले. त्यानंतर त्याला अहमदाबाद टायटन्सने विकत घेत संघाचे कर्णधारपदही देऊ केले आहे.

दिल्लीचा एकेकाळचा कॅप्टन श्रेयस अय्यर : श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) दुखापतग्रस्त झाला आणि त्याला दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदापासून हात धुवावा लागला. आता दिल्ली कॅपिल्सने त्याला रिलीज केले असून तो आता लिलावासाठी उपलब्ध असणार आहे. त्याने दिल्लीकडून 87 सामन्यात 31.66 च्या सरासरीने 2375 धावा केल्या होत्या. यंदाच्या लिलावात त्याची बेस प्राईस 2 कोटी असणार आहे.

दिल्लीकडून धावांचे शिखर बांधणारा शिखर धवन : दिल्ली कॅपिटल्सने अय्यर बरोबरच शिखर धवनला (Shikhar Dhawan) देखील रिलीज केले. त्यामुळे या डावखुऱ्या वरिष्ठ फलंदाजाला आता नवी फ्रेंचायजी शोधावी लागणार आहे. त्याने दिल्लीकडून 63 सामन्यात 38.98 च्या सरासरीने 2066 धावा केल्या होत्या. यंदाच्या लिलावात त्याची बेस प्राईस 2 कोटी असणार आहे.

मुंबईचा लाडका किशन झाला बेघर : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) हा आयपीएल इतिहासातील एक तगडा संघ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या संघातून सर्वाधिक स्टार खेळाडू रिलीज झाले आहेत. मुंबईने धडाकेबाज फलंदाज इशान किशनला (Ishan Kishan) देखील रिलीज केले आहे. मात्र मुंबईने त्याला पुन्हा संघात घेण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. किशनने मुंबईकडून 45 सामन्यात 31.47 च्या सरासरीने 1133 धावा केल्या आहेत. त्यानेही आपली बेस प्राईस 2 कोटी ठेवली आहे.

आरसीबीचा स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहल : बंगळुरूच्या आव्हानात्मक खेळपट्टीवर देखील युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) चांगली गोलंदाजी केली होती. मात्र रॉयल चॅलेंजर बेंगलोरने त्याला रिलीज करण्याचा धोका पत्करला आहे. त्याने आरसीबीकडून 113 सामन्यात 7.58 ची सरासरी राखत 139 विकेट घेतल्या होत्या. आता 2 कोटी बेस प्राईस असलेला युझवेंद्र लिलावाला सामोरा जाणार आहे.

केकेआरने देखील सोडला शुभमन गिल : कोलकाता नाईट रायडर्सने युवा फलंदाज शुभमन गिलला (Shubman Gill) रिलीज केल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. कारण गिलने केकेआरकडून 58 सामन्यात 31.48 च्या सरासरीने 1417 धावा केल्या होत्या. गिल लिलावात उतरणार असे वाटत असतानाच गुजरात टायटन्सने त्याला विकत घेतले.

धोनीचा याराना रैनाच्या कामी नाही आला : चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) हा बुजूर्ग खेळाडूंचा संघ म्हणून ओळखला जातो. त्यांना यंदाच्या लिलावात आपल्या संघात युवा खेळाडूंना स्थान देऊन भविष्यातील संघबांधणी करण्याची संधी आहे. म्हणूनच त्यांनी सुरेश रैनासारख्या (Suresh Raina) वरिष्ठ खेळाडूला रिलीज करत ऋतुराज गायकवाड सारख्या युवा फलंदाजाला रिटेन केले. सुरेश रैनाचे सीएसकेकडूनचे रेकॉर्ड जबरदस्त आहे. त्याने 176 सामन्यात 32.32 च्या सरासरीने तब्बल 4687 धावा केल्या आहेत. आता तो 2 कोटीच्या बेस प्राईससह लिलावात उतरणार आहे.

पांड्या बुंधूंमधला दुसऱ्या पांड्या देखील मुंबईने काढला : मुंबई इंडियन्सने हार्किद पांड्याबरोबरच कृणाल पांड्यालादेखील (Krunal Pandya) रिलीज केले आहे. हार्दिकचे अहमदाबादमध्ये पुर्नवसन झाले आहे. मात्र कृणाल पांड्याचे काय? कृणाल पांड्याने मुंबईकडून 84 सामन्यात 22.86 च्या सरासरीने 1143 धावा केल्या होत्या. तर 7.36 ची सरासरी राखत 51 विकेट देखील घेतल्या होत्या. कृणाल पांड्याने लिलावात आपली बेस प्राईस 2 कोटी ठेवली आहे.