- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- मनोरंजन
- सप्तरंग
- YIN युवा
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- धन की बात
- क्रीडा
- आणखी..
- करिअर-नोकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- Myfa
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- दैनंदिन भविष्य
- साप्ताहिक भविष्य
- संपादकीय
- विज्ञान तंत्रज्ञान
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- ब्लॉग
- फुड
- आरोग्य
- काही सुखद
- प्रतिक्रिया-युनियन-बजेट
- वुमेन्स-कॉर्नर
- अर्थसंकल्प 2022
Indian Army : जवान प्रथमेश पवार यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

कुडाळ : सातारा जिल्ह्यातील (Satara District) जावळी तालुक्यामधील (Jawali Taluka) बामणोली तर्फ कुडाळ येथील जवान प्रथमेश संजय पवार (Jawan Prathamesh Sanjay Pawar) आज अनंतात विलीन झाले.

आज सकाळी साडेदहाच्या सुमारस बामणोली (Bamnoli) तर्फ कुडाळ येथील दत्तमंदिरानजीक मोकळ्या पटांगणावर शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा लहान भाऊ आदित्य पवार यांनी साश्रू नयनांनी मुखाग्नी दिला.

शहीद जवान प्रथमेश यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कुटुंबीय, मित्रपरिवारासह संपूर्ण जावळी तालुका, जिल्हाभरातून हजारो नागरिक बामणोलीत आले होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

बामणोलीसह आजूबाजूच्या गावागावात पहाटे पासूनच देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते. पुणे येथून त्यांचे पार्थिव सकाळी सात वाजता पाचवड (ता. वाई) येथे आणण्यात आले.

येथून फुलांनी सजवलेल्या ट्रॉलीतून जवान प्रथमेश यांचे पार्थिव घेऊन निघालेली शोभायात्रा सरताळे, कुडाळ, शेते, सोमर्डी मार्गे, बामणोली तर्फ कुडाळ, डेरेवाडी येथे पोहचली. त्यानंतर त्यांच्या घरी पार्थिव नेण्यात आले.

पार्थिव घरी पोहचताच जवान प्रथमेश यांच्या आईने व लहान भाऊ आदित्य यांनी केलेला आक्रोश उपस्थितीतांचे मन हेलावून टाकणारा होता. परिसरातील गावागावातील आबालवृद्ध, महिला, युवक शहीद जवान यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येने रस्त्यावर उभे होते.

या अंत्ययात्रेत देशभक्तीपर गीतांबरोबरच 'भारत माता की जय', 'वंदे मातरम', 'अमर रहे... अमर रहे... शहीद जवान प्रथमेश पवार अमर रहे', अशा घोषणा देत होते.

सकाळी 10.30 वाजता त्यांच्यावर अंत्यत शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला.

यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale), वसंतराव मानकुमरे, जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, तहसीलदार राजेंद्र पोळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी, पदाधिकारी, माजी सैनिक उपस्थित होते.

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.