अरबपती आहे जस्टिन बीबर,पॅरालिसिस होण्याआधी 'या' आजारांशी सुरु होती झुंज...Justin Bieber | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अरबपती आहे जस्टिन बीबर,पॅरालिसिस होण्याआधी 'या' आजारांशी सुरु होती झुंज...

Justin Bieber
प्रसिद्ध गायक जस्टिन बीबर आपल्या गाणी आणि वादांमुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. पण सध्या तो त्याच्या आजारपणामुळे चर्चेत आला आहे.
जस्टिन बीबरला रमसे हंट सिंड्रोम असा गंभीर प्रकारचा आजार झाला आहे. एक व्हायरस या आजारासाठी कारणीभूत आहे असं बोललं जात आहे. त्याच्या अर्ध्या चेहऱ्याला पॅरालिसिस झाला आहे. पण या बातमीमुळे त्याच्या चाहत्यांना मात्र त्याची काळजी वाटू लागली आहे. आणि सगळेच तो लवकर बरा व्हावा म्हणून प्रार्थना करताना दिसत आहेत.

प्रसिद्ध गायक जस्टिन बीबर आपल्या गाणी आणि वादांमुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. पण सध्या तो त्याच्या आजारपणामुळे चर्चेत आला आहे. जस्टिन बीबरला रमसे हंट सिंड्रोम असा गंभीर प्रकारचा आजार झाला आहे. एक व्हायरस या आजारासाठी कारणीभूत आहे असं बोललं जात आहे. त्याच्या अर्ध्या चेहऱ्याला पॅरालिसिस झाला आहे. पण या बातमीमुळे त्याच्या चाहत्यांना मात्र त्याची काळजी वाटू लागली आहे. आणि सगळेच तो लवकर बरा व्हावा म्हणून प्रार्थना करताना दिसत आहेत.

इंटरनेटवर आता जस्टिनच्या  अनेक गोष्टी माहित करुन घेण्यासाठी सर्च केलं जात आहे. जसं की त्याचं नेट वर्थ किती आहे,तो महिन्याला किती कमावतो,त्याचं कुटुंब,त्याचे अफेयर्स,त्याची बायको हेली बीबर या सगळ्या बाबतील लोकांना  माहीत करुन घ्यायचं आहे.

मीडियाला मिळालेल्या वृत्तानुसार जस्टिन बीबरची नेट वर्थ संपत्ती अरबोंमध्ये आहे. त्याची पूर्ण संपत्ती २२ अरब,२८ करोड,६लाख,७३ हजार इतकी आहे. आश्चर्य वाटलं असेल ना तुम्हाला. त्यानं संपत्तीच्या बाबतीत बालीवूडचे सुपरस्टार शाहरुख खान,सलमान खान आणि आमिर खानला देखील मागे टाकलं आहे. त्याची वर्षभराची कमाई २३ मिलियन डॉलर म्हणजे(१ अरब,७९ करोड,७३ हजार,५०० इतकी आहे.

जस्टिनजवळ महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे. त्याच्याजवळ तब्बल ११ गाड्या आहेत. यांची किंमत मिळून अरबोंमध्येच आहे. यांमध्ये  Audi R8, Lamborghini Urus, Futuristic Rolls Royce Ghost, तीन G-Wagons, Chrome blue Ferrari 458 Italia अशा गाड्यांचा समावेश आहे.

जस्टिन आपली पत्नी हेली बीबर सोबत आलिशान बंगल्यात राहतो. हे घर अडीच एकर जागेत बांधलेलं आहे. या प्रॉपर्टीची किंमत सुमारे २५,८ मिलियन डॉलर एवढी आहे.  याव्यतिरिक्त कॅनडात देखील त्याचे घर आहे. याची किंमत ५ मिलियन डॉलर म्हणजे ३९ करोड,७ लाख,१७ हजार ५०० रुपये असल्याचं बोललं जात आहे. जस्टिनकडे आणखी एक घर आहे ज्याची किंमत ६३ करोड इतकी आहे.

जस्टिनला पॅरालिसिस होण्याआधी देखील तो अनेक आजारांशी झुंज देत होता.त्यानं स्वतः खुलासा केला होता की तो डिप्रेशन आणि अॅंजायटी या दोन आजारांनी काही काळ ग्रस्त होता.  २०२० साली जस्टिननं खुलासा केला होता की तो लाइम डिसिजसोबत देखील झुंज देत होता. त्याला Mononucleosis इंफेक्शनचा देखील त्रास आहे, जो  Neurological आणि संपू्र्ण शरीरावर परिणाम करतो. जानेवारी महिन्यात याविषयी खुलासा केल्यानंतर फेब्रुवारी  महिन्यात जस्टिननं आपल्याला ड्रग्ज घेण्याची सवय लागली आहे याविषयी देखील सांगितले होते.

वयानं केवळ २८ वर्षांचा असलेला जस्टिन आपल्या करिअरसोबतच अनेक वादांनी चर्चेत राहिला. त्याच्यावर आरोप होता की त्यानं आपल्या शेजाऱ्याला अंडे फेकून मारले होते.वर्णद्वेषावर भाष्य करताना काळ्या रंगाला हिणवलं होतं तेव्हा देखील  तो वादात पडला होता. चीन सरकारनं त्याच्यावर बंदी आणली आहे. तिथे एका महिलेनं त्याच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. जस्टिननं अगदी लहान वयात अनेक पुरस्कार पटकावले आहेत. २ ग्रॅमी अॅवॉर्ड्स,१४ वेळा गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याचं नाव दाखल झालं आहे. त्याची गाणी जगभरात प्रसिद्ध आहेत.

go to top