esakal | अवघ्या ५००० रुपयांत द्या भारतातील या टॉप पर्यटन स्थळांना भेट; जाणून घ्या बजेट मॅनेजमेंट
sakal

बोलून बातमी शोधा

अवघ्या ५००० रुपयांत द्या भारतातील या टॉप पर्यटन स्थळांना भेट

sakal author
By
अथर्व महांकाळ
अवघ्या ५००० रुपयांत द्या भारतातील या टॉप पर्यटन स्थळांना भेट

कुटुंबासह कुठेही फिरायला जायचं म्हंटलं की सर्वात पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे पैशांचा. अनेकदा भारतात कुठीच फिरायला (Traveling destinations in India) जाण्यासाठी हजारो रुपये खर्च होऊन जातात. एखाद्या पर्यटन स्थळातील राहण्याचं ठिकाण, तिथलं जेवण आणि येण्या-जाण्याचा (Budget Management in traveling) खर्च धरून अक्षरशः खिसा रिकामा होतो. .मात्र आज तुम्हाला अशा काही पर्यटन स्थळांची नावं सांगणार आहोत जिथे अवघ्या ५ हजारांमध्ये तुम्ही फुल एन्जॉय करू शकता. चला तर मग जाणून घेऊया. (know destinations in India where you enjoy just in 5k)

मनाली (Manali) -- 

हिमाचल प्रदेशमधील मनालीमध्ये तुम्हाला बर्फाचा आनंद घेता येईल. इथे राहण्यासाठी ५०० रुपये प्रतीव्यक्तीपासून सुरुवात आहे. तर जेवणासाठी आणि इतर गोष्टींसाठी तुम्हाला  १००० रुपये लागू शकतात. दिल्लीपासून मनालीसाठी बस तिकीट ७०० रुपये प्रति व्यक्ती आहे. ऑक्टोबर ते जून महिन्यादरम्यान पर्यटनास गेल्यास इथे तुम्हाला स्वर्गाची अनुभूती मिळू शकते.

मनाली (Manali) -- हिमाचल प्रदेशमधील मनालीमध्ये तुम्हाला बर्फाचा आनंद घेता येईल. इथे राहण्यासाठी ५०० रुपये प्रतीव्यक्तीपासून सुरुवात आहे. तर जेवणासाठी आणि इतर गोष्टींसाठी तुम्हाला १००० रुपये लागू शकतात. दिल्लीपासून मनालीसाठी बस तिकीट ७०० रुपये प्रति व्यक्ती आहे. ऑक्टोबर ते जून महिन्यादरम्यान पर्यटनास गेल्यास इथे तुम्हाला स्वर्गाची अनुभूती मिळू शकते.

गोकर्ण (Gokarn)-- 

गोकर्ण इथे राहण्यासाठी ७५० रुपये प्रतीव्यक्तीपासून सुरुवात आहे. तर जेवणासाठी आणि इतर गोष्टींसाठी तुम्हाला १००० रुपये लागू शकतात. बँगलोरपासून गोकर्णंसाठी बस तिकीट ५०० रुपये प्रति व्यक्ती आहे. इथे जाण्यास उत्तम कालावधी हा ऑक्टोबर ते मार्च महिन्यादरम्यान आहे.

गोकर्ण (Gokarn)-- गोकर्ण इथे राहण्यासाठी ७५० रुपये प्रतीव्यक्तीपासून सुरुवात आहे. तर जेवणासाठी आणि इतर गोष्टींसाठी तुम्हाला १००० रुपये लागू शकतात. बँगलोरपासून गोकर्णंसाठी बस तिकीट ५०० रुपये प्रति व्यक्ती आहे. इथे जाण्यास उत्तम कालावधी हा ऑक्टोबर ते मार्च महिन्यादरम्यान आहे.

पॉंडिचेरी (Pondicherry) -- 

पॉंडिचेरी हे खूप सुंदर ठिकाण आहे. इथे राहण्यासाठी तुम्हाला ८०० रुपये प्रतिव्यक्ती या दरानं रूम मिळू शकतात. तर जेवणासाठी आणि इतर गोष्टीसाठी इथे तुम्हाला १४०० रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. चेन्नईपासून बसनं प्रवास करता येईल. यासाठी तुम्हाला ५०० रुपये पडतील. तर इथे जाण्याचा उत्तम कालावधी हा नोव्हेंबर ते मार्चदरम्यान आहे.

पॉंडिचेरी (Pondicherry) -- पॉंडिचेरी हे खूप सुंदर ठिकाण आहे. इथे राहण्यासाठी तुम्हाला ८०० रुपये प्रतिव्यक्ती या दरानं रूम मिळू शकतात. तर जेवणासाठी आणि इतर गोष्टीसाठी इथे तुम्हाला १४०० रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. चेन्नईपासून बसनं प्रवास करता येईल. यासाठी तुम्हाला ५०० रुपये पडतील. तर इथे जाण्याचा उत्तम कालावधी हा नोव्हेंबर ते मार्चदरम्यान आहे.

हंपी (Hampi)  -- 

हंपी हे ठिकाण भारताचं बाली म्हणून ओळखलं जातं. इथे राहण्यासाठी तुम्हाला ७०० रुपये प्रतीव्यक्तीपासून रूम मिळू शकतील. इथे जेवणासाठी आणि इतर गोष्टींसाठी तुम्हाला १२०० रुपये मोजावे लागतील. बँगलोरपासून इथे पोहोचण्यासाठी तुम्हाला बसनं ६०० रुपये लागतील. इथे भेट देण्याचा उत्तम कालावधी हा ऑक्टोबर ते मार्चदरम्यान आहे.

हंपी (Hampi) -- हंपी हे ठिकाण भारताचं बाली म्हणून ओळखलं जातं. इथे राहण्यासाठी तुम्हाला ७०० रुपये प्रतीव्यक्तीपासून रूम मिळू शकतील. इथे जेवणासाठी आणि इतर गोष्टींसाठी तुम्हाला १२०० रुपये मोजावे लागतील. बँगलोरपासून इथे पोहोचण्यासाठी तुम्हाला बसनं ६०० रुपये लागतील. इथे भेट देण्याचा उत्तम कालावधी हा ऑक्टोबर ते मार्चदरम्यान आहे.