सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीने तिच्या साध्या राहणी आणि आकर्शक अभिनयाने लाखो चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहे.अभिनेत्रीने तमिळ,तेलगू आणि मल्याळम भाषेतील चित्रपटांमधे काम केले आहे.अभिनेत्री असून मेकअप न करता पडद्यावर येणारी ही पहिलीच अभिनेत्री असावी.पण तिच्या मेक अप न करण्याचं काय कारण असावं ते आपण आज जाणून घेणार आहोत.
साईने २०१५ मधे 'प्रेमम' या चित्रपटातून करियरला सुरूवात केली होती.त्यानंतर तिने कधी मागे वळून बघितले नाही.साईचं खास गोष्ट सांगायची झाल्यास साईला मोठमोठ्या चित्रपटात प्रेक्षकांनी अगदी सिंपल लूकमधे बघितले आहे.अनेकदा तिच्या लूकचं लोकांना आश्चर्यही वाटतं.
मुलींना मेक अप म्हटलं की त्यांचा अतिशय आवडता छंद असं म्हणायला हरकत नाही.आणि सिनेजगतात तर मेकअप करणाऱ्या अभिनेत्री असतात असा लोकांचा समज असतो.आणि तो खराही आहे.पण साई मात्र यांच्या यादीत येत नाही.
एकदा साईला तिच्या नो मेक अप आणि साध्या राहणीबाबत एका मुलाखतीत विचारण्यात आलं होतं.त्यावेळी तिने जे कारण सांगितलं ते कदाचित अनेकांना माहिती नसणारं आहे.एका मुलाखतीत साई म्हणाली,प्रेमम या चित्रपटाचे दिग्दर्शक अल्फोंस पुथरेन यांनी त्यांच्या प्रेमम चित्रपटात साईला मेकअप न करता साधे राहण्यासाठी प्रोत्साहित केले होते.त्यामुळे साईचा आत्मविश्वास वाढला.
त्यानंतर साईने जेवढ्याही दिग्दर्शकांसोबत काम केले त्या सगळ्यांनीही साईला ती आहे तशी राहाण्यास प्रोत्साहित केले.साईच्या मते ती मेकअप न करता तिच्या सारख्या अनेक मुलींचा आत्मविश्वास वाढवते.
साईने एका ब्यूटी क्रिमची चक्क दोन कोटीची जाहिरात करण्यास नकार दिला होता.तिच्या साध्या नो मेक अप चेहऱ्याचं सोशल मीडियावरही फार कौतुक होतं.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.