Kokan Rain latest news updates: पावसात जिल्ह्यातील छोटे-मोठे पूल, रस्ते, शेतशिवारे पाण्याखाली गेली. बाजारपेठांतही पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले. ठिकठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते. मुसळधार पावसामुळे छोटे-मोठे धबधबेही प्रवाहित झाले आहेत. जिल्ह्यातील पावसाची स्थिती दर्शवणारी ही छायाचित्रे....
वैभववाडी : बाजारपेठेत तुंबलेले पाणी.
बांदा : निमजगा येथे कामगारांच्या वस्तीत पाणी शिरल्याने सामान वाहून गेले.
आरोस : दांडेली पुलावरून पाणी वाहत असल्याने ठप्प झालेली वाहतूक.
मळगाव : येथील ओसंडून वाहणारा धबधबा.
मठ : येथील गावठणवाडी ते स्वयंभू मंदिरकडे जाणारा रस्ता खचला.
नापणे : येथील विष्णू जैतापकर यांच्या घरानजीक शुकनदीच्या पुराचे पाणी पोहोचल्यामुळे त्यांचे स्थंलातर करण्यात आले.
तळवडे ः येथील ओहळाच्या पुलावरून वाहणाऱ्या पाण्यातून वाट काढताना ग्रामस्थ.
मालवण ः घुमडे येथील घुमडाई मंदिरास पाण्याने दिलेला वेढा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.