sakal

बोलून बातमी शोधा

डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून मुक्ती देणाऱ्या कोपर पुलाचे पाच फायदे

कोपर पुल, डोबिवली.
कोपर पूल सुरू झाल्याने वाहनचालकांना जो द्राविडी प्राणायाम करीत शहराच्या एका टोकाला असलेला ठाकुर्ली उड्डाणपूल गाठून प्रवास करावा लागत होता. हा वळसा आता वाचणार आहे.

डोंबिवली शहरात ठाणे दिशेकडे राहणाऱ्या जसे की आयरे गाव, म्हात्रे नगर, दत्तनगर, मोठागाव, कोपर, जुनी डोंबिवली या परिसरातील नागरिकांना कोपर पूल झाल्याने मोठा दिलासा मिळणार आहे. त्यांना पूर्व पश्चिम प्रवास करण्यासाठी शहराचे दुसरे टोक गाठावे लागत होते.

मानपाडा रोड, मंजुनाथ शाळा, व्ही. पी. रस्ता, छेडा रोड, स.वा.जोशी शाळा या डोंबिवली तील अंतर्गत रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल.

ठाकुर्ली उड्डाणपूल अरुंद व वळणदार असल्याने अवजड वाहने जसे की बस, ट्रक अशा वाहनांना वळण घेताना अडचणी येतात. शिवाय त्यामुळे वाहतूक कोंडी होत होती. कोपर पूलाची रुंदी वाढविण्यात आली असून अवजड वाहने आता या पुलावरून प्रवास करू शकतील. ठाकुर्ली पुलावर त्यांना जावेच लागणार नाही.

टॅग्स :dombivali