फोटो : आषाढी एकादशीनिमित्त विठ्‌ठल मंदिराला करण्यात आलेली विद्युत रोषणाई

रविवार, 28 जून 2020

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या संकटामुळे यंदा आषाढी यात्रा भरणार नसली तरी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने उदासीन भूमिका घेतलेली नाही. पुणे येथील इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर विनोद जाधव दरवर्षी श्री विठ्ठल मंदिरावर विनामूल्य विद्युत रोषणाई करून देतात. त्यांच्या सहकार्याने यंदा देखील श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीने मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे.

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या संकटामुळे यंदा आषाढी यात्रा भरणार नसली तरी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने उदासीन भूमिका घेतलेली नाही. पुणे येथील इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर विनोद जाधव दरवर्षी श्री विठ्ठल मंदिरावर विनामूल्य विद्युत रोषणाई करून देतात. त्यांच्या सहकार्याने यंदा देखील श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीने मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. या मनमोहक रोषणाईमुळे मंदिराचा सारा परिसर उजळून निघाला आहे. सोलापूर ग्रामीण पोलिस दलाने ड्रोनच्या सहाय्याने श्री विठ्ठल- रूक्मिणी मंदिर परिसराचे चित्रीकरण केले आहे.