लॉकडाऊनमुळे प्राण्यांचा पाहायला मिळतोय मुक्तसंचार

Updated on

जगभर थैमान घालत असलेल्या कोरोनामुळे संपूर्ण भारतात संचारबंदी घालण्यात आलेली आहे. अशातच मुंबईतून मनाला सुखावून जाणारी दृश्य पाहायला मिळत आहे. मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्क परिसरात वन्यप्राण्यांचा मुक्त संचार आता पाहायला मिळत आहे.

संचारबंदी मुळे येथे लोकांची वर्दळ पूर्णपणे थांबली असून या अभयारण्याला खऱ्या अर्थाने जंगलाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मुंबईतील सकाळचे वाचक स्वप्नील नावडकर यांनी या परिसरातील काही मनमोहक अशी छायाचित्रे घेतली आहेत. या छायाचित्रात हरणांचा कळप मुक्तपणे फिरत असताना दिसतोय. तर एका छायाचित्रात माणसांप्रमाणे हरीण रस्त्यावर वॉकिंगला आलेलं दिसत आहे. तसेच निसर्गाचे सुंदर रूप या छायाचित्रातून आपल्याला पाहायला मिळत आहे.
(छायाचित्रे - रफिक पठाण)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com