Mahabaleshwar मध्ये 40 मजुरांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोला भीषण अपघात; पाहा मन हेलावून टाकणारे Photo
रस्ते कामासाठी हे मजूर महाबळेश्वर इथं आले असल्याची माहिती मिळत असून, आज (शनिवार) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील मुकदेव गावानजीक तीव्र उतारावर बुलढाणा व अकोला भागातून मजूर घेऊन जाणाऱ्या 407 टेम्पोला अपघात झाला.
टेम्पोमध्ये एकूण 40 लोक असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
रस्ते कामासाठी हे मजूर महाबळेश्वर इथं आले असल्याची माहिती मिळत असून, आज (शनिवार) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
या अपघातातील जखमींना तळदेव इथं तर काहींना महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.
यातील दोन गंभीर जखमी लहान मुलांना सातारा इथं पाठविण्यात येणार आहे.
सह्याद्री ट्रेकर्सचे जवान संजय पार्टे, दीपक जाधव, गायकवाड व ग्रामस्थांनी अपघातस्थळी मदतकार्य केलं.