Maharashtra Politics | PHOTOS: शिंदे फडणवीसांची पुन्हा रात्रीत खलबतं; ६ तासांच्या बैठकीत काय घडलं? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PHOTOS: शिंदे फडणवीसांची पुन्हा रात्रीत खलबतं; ६ तासांच्या बैठकीत काय घडलं?

Amit Shah Devendra Fadnavis Eknath Shinde
महाराष्ट्रातल्या दहा दिवसांच्या सत्तानाट्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात आपलं सरकार स्थापन केलं असून त्यानंतर पहिल्यांदाच ते उघडपणे दिल्ली दरबारी गेले आहेत.

दिल्लीत जाऊन त्यांनी भाजपा पक्षश्रेष्ठी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.

शिंदेंच्या बंडानंतर १० दिवस सत्तानाट्य सुरू होतं. यादरम्यान शिंदे आणि फडणवीस गुप्तपणे अमित शाह तसंच भाजपाच्या इतर पक्षश्रेष्ठींची भेट घेत असल्याच्या चर्चा होत्या. मात्र आता मुख्यमंत्री पद मिळवल्यानंतर उघडपणे पहिल्यांदाच ही भेट घडत आहे.

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी अमित शाहांना विठ्ठल-रखुमाईची मूर्ती भेट दिली. मध्यरात्री उशिरापर्यंत ही खलबतं सुरू होती.

रात्री साडे नऊ वाजता अमित शाह यांच्या निवासस्थानी सुरू झालेली बैठक मध्यरात्री दोन-अडीच वाजेपर्यंत चालली.

या सहा तासांच्या बैठकीत खातेवाटप, तसंच कायदेशीर लढाईबद्दलही चर्चा झाली.

११ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. १६ आमदारांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली आहे.

तसंच शिवसेनेच्या पक्षचिन्हावरुनही आता वाद उफाळून आला आहे. पक्षाचं चिन्ह शिंदे गटाकडे जाणार की ठाकरे गटाकडेच राहणार ही लढाई आता न्यायालयात पोहोचली आहे. त्याविषयीही चर्चा झाली.

go to top