PHOTO - महाराष्ट्र दिन : अस्सल मराठी मातीची ओळख सांगतात हे रुचकर पदार्थ
मुंबई : गोडधोड, तिखटजाळ, आंबटचिंबट अशा विविध चवींनी युक्त अशी खाद्यसंस्कृती अनुभवायची असेल तर महाराष्ट्रीय पदार्थांचा आस्वाद नक्की घ्यायला हवा. रस्त्याच्या कडेला कधीही उपलब्ध होणारा वडा-पाव असो वा सणासुदीला तयार केल्याा जाणाऱ्या पुरणपोळ्या खाणाऱ्याच्या जीभेवर चव रेंगाळत राहिली नाही तरच नवल.. आजच्या महाराष्ट्र दिनानिमित्त जाणून घेऊ या अशाच काही महाराष्ट्रीय पदार्थांविषयी.
अळूवडी अळूच्या पानांमध्ये चण्याच्या पीठाचं सारण भरून त्या पानांची गुंडाळी केली जाते. याला उंडी म्हणतात. नंतर ही उंडी वाफवून त्याच्या छोट्या-छोट्या वड्या कापल्या जातात. कापलेल्या वड्या तळून खाल्ल्या जातात.
घावणे हा अस्सल मालवणी पदार्थ आहे. करायलाही अगदी सोप्पा आहे. तांदळाच्याा पीठात पाणी घालून ते अगदी पातळ केले जाते व त्यात मीठ घातले जाते. जाडसर भिड्यावर पातळ पिठाचे घावणे घालतात.
कोथिंबीर वडी कोथिंबीर बारीक चिरून ती चण्याच्या पिठात घोळवली जाते. त्याच्या गोल गुंडाळ्या करून अळूवडीप्रमाणे वाफवल्या जातात व नंतर त्याचे छोटे तुकडे करून तळले जातात.
पुरणपोळी मैद्याच्या किंवा गव्हाच्या पिठाच्या पोळ्या लाटून त्यात डाळ-गुळाचे पुरण भरले जाते.
मिसळ म्हणजे वेगवेगळे कडधान्य एकत्र करून तयार केलेला तिखट आणि झणझणीत रस्सा. कांदा, लिंबू, भरपूर फरसाण आणि पाव यांच्यासोबत आपण मिसळ पावाचा आस्वाद घेतो.