एअरपोर्ट लूक विसरा, आता आलाय नेत्यांचा ED लूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एअरपोर्ट लूक विसरा, आता आलाय नेत्यांचा ED लूक

maharashtra political leaders on whom ED

काँग्रेस नेते राहुल गांधी नॅशनल हेराल्डशी (Nationa Herald) संबंधित कथित आर्थिक गौरव्यवहाराबाबत चौकशी करण्यासाठी यांना ईडीने समन्स बजावले नंतर सोमवारी राहुल गांधी ईडीच्या कार्यालयात हजर झाले. ईडी आणि राजकीय नेते यांचा एकमेकांशी किती जवळचा संबंध आहे हे गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र अनुभवत आहे. महाविकास आघाडी सरकारने सत्तास्थापन केल्यानंतर सत्ताधारी आणि भाजप यांच्यात तीव्र संघर्षाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील राजकारणात राजकीय नेते आहे, त्याच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले आहेत.(maharashtra political leaders on whom ED took action)

अल्पसंख्याकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर आता ते न्यायालयीन कोठडीत आहेत. बेकायदेशीर मालमत्ता प्रकरण आणि 'D-गँग' संबंधित आर्थिक व्यवहार प्रकरणात त्यांची चौकशी सुरू आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 2 नोव्हेंबर 2021 रोजी जवळपास 15 तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटक केली. गेल्या साडेचार महिन्यांपासून अनिल देशमुख ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांची जामीन याचिका मुंबई सेशन कोर्टाने नुकतीच फेटाळली आहे. 100 कोटी रुपयांची खंडणी आणि मनीलाँड्रींग प्रकरणी त्यांच्याविरोधात चौकशी सुरू आहे.

छगन भुजबळ यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या पैशांचा अफरातफरीमध्ये सरकारला 870 कोटी रूपयांचा फटका बसल्याचाा आरोप भुजबळांवर होता. त्याप्रकरणी छगन भुजबळ यांना 14 मार्च 2016  अटक करण्यात आली. दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामात गैरव्यवहार आणि कलिना येथील जमीन हडप करण्याचे गुन्हे भुजबळ यांच्यावर नोंदवण्यात आले होते.

भाजपतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची भोसरी जमीन प्रकरणी  ईडीने चौकशी केली होती. एकनाथ खडसे यांच्या जावयाला ईडीने अटक केली असून ते ईडीच्या कोठडीत आहेत.

संजय राऊत एका बड्या उद्योजकासोबतही त्यांच्या मुलींची व्यवसायिक भागीदारी असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. पीएमसी बँकेच्या कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीज बजावली होती. तसंच त्यांचा जबाबही नोंदवून घेतला आहे.  महाविकास आघाडी सरकारच्या सत्तास्थापनेच्या घडामोडीत संजय राऊत यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते.

दापोली येथे अनिल परब यांनी अनधिकृत रेसॉर्ट बांधल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. यासंदर्भात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे त्यांनी लेखी तक्रार केली आहे. या प्रकरणी अनिल परब यांच्यावर कारवाई होणार असा दावाही सोमय्या यांनी केला आहे. अनिल परब यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयातही बोलवण्यात आलं होतं. याआधी ईडीने समन्स बजावल्यानंतर अनिल परब यांनी चौकशीसाठी 14 दिवसांची मुदत मागितली होती. ईडीने ही विनंती मान्य केली होती.

go to top