'ज्यांच्या हिंदूत्वात ED, CBI त्यांच्याबरोबर जाणार आम्ही!'| Maharashtra Politics Eknath Shinde Viral Memes | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Memes: 'ज्यांच्या हिंदूत्वात ED, CBI त्यांच्याबरोबर जाणार आम्ही!'

Eknath Shinde News: शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे आता 42 आमदारांसह वेगळी चुल मांडण्याच्या प्रयत्नात आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील राजकारण भलत्याच स्थितीत (Maharshtra News) आहे. त्याबाबत कुणीही ठामपणे काय चाललं आहे, काय होईल याविषयी सांगताना दिसत नाही. दिग्गज राजकारण्यांच्या बैठका सुरु आहे. चर्चा होत आहेत. (Social media news) त्यातून मार्ग मात्र वेगळाच समोर येतो आहे. यासगळ्या घटनांचे सोशल मीडियावरुन पडसाद उमटताना दिसत आहे.

एकनाथ शिंदे, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर वेगवेगळे मीम्स व्हायरल झाले आहेत.

सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या मीम्समधून गंमतीशीरपणे सद्यस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे. त्यात एकनाथ शिंदे यांनी कशाप्रकारे उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंडखोरी केली. ते सांगण्यात आले आहे.

सध्या शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणानं वेगळं वळण घेतलं आहे. यासगळ्या परिस्थितीवर मार्मिक भाष्य करणारे मीम्स लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटामध्ये ज्यानं एकनाथ शिंदे यांची भूमिका केली त्या क्षितिज दातेनं देखील आपल्याला या मीम्सचा भलताच त्रास झाल्याचे सांगितले आहे.

येत्या काळात महाराष्ट्रातील राजकारण कोणत्या स्थितीत असणार याचा अंदाज वर्तवणे कठीण झाले आहे. मात्र मीम्सच्या माध्यमातून त्या परिस्थितीवर टीका करण्यात आली आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर गंमतीशीरपणे टिप्पणी करणाऱ्या मीम्सला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

go to top