sakal

बोलून बातमी शोधा

Photo: 'भाग्य दिले तू मला' मालिकेत रंगली मंगळागौर..

Photo: 'भाग्य दिले तू मला' मालिकेत रंगली मंगळागौर..

colors marathi : कलर्स मराठीवरील आपल्या सगळ्यांच्या आवडत्या 'भाग्य दिले तू मला' मालिकेत रत्नमाला मोहिते मंगळागौर मोठ्या उत्साहात साजरी करताना दिसणार आहेत. श्रावण महिना म्हंटलं की सर्वात पहिले डोळ्यासमोर उभे राहतात ते श्रावण महिन्यातील सण. श्रावण महिना आला की चाहूल लागते ती सणांची. श्रावण सुरू झाल्यावर येणारे श्रावणी सोमवार, महादेवाची पूजा, पण त्यातही मंगळागौर म्हटलं की, महिलांचा विशेष उत्साह दिसून येतो, कारण मंगळागौर हा महिलांचा जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे याही मालिकेत मंगळागौरीची चांगलीच जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्याचेच हे काही खास फोटो..

यावेळी घरातील सगळ्याच महिलांनी पारंपारिक नऊवारी साडी नेसली आहे. कावेरी इतर महिलांसोबत मंगळागौरीचे खेळ खेळताना दिसणार आहे. कारणही तसंच आहे. आता हे काय कारण आहे ते लवकरच प्रेक्षकांना कळेल. 

वर.

यावेळी घरातील सगळ्याच महिलांनी पारंपारिक नऊवारी साडी नेसली आहे. कावेरी इतर महिलांसोबत मंगळागौरीचे खेळ खेळताना दिसणार आहे. कारणही तसंच आहे. आता हे काय कारण आहे ते लवकरच प्रेक्षकांना कळेल. वर.

मालिकेत मंगळागौर साजरी करण्यात येणार आहेच, परंतू सानिया मात्र या आनंदाच्या क्षणात मिठाचा खडा टाकणार आहे. रत्नमाला मोहित आणि कावेरीला कसं दूर करता येईल याचा कट रचणार आहे.

मालिकेत मंगळागौर साजरी करण्यात येणार आहेच, परंतू सानिया मात्र या आनंदाच्या क्षणात मिठाचा खडा टाकणार आहे. रत्नमाला मोहित आणि कावेरीला कसं दूर करता येईल याचा कट रचणार आहे.

 मंगळागौरीची पूजा पार पडते आणि त्यानंतर खेळांना सुरुवात होते. पण, याच उत्साहाच्या वातावरणात आता कोणता नवा ट्विस्ट येणार ? काय घडणार ? हे आगामी भागात कळेल.

मंगळागौरीची पूजा पार पडते आणि त्यानंतर खेळांना सुरुवात होते. पण, याच उत्साहाच्या वातावरणात आता कोणता नवा ट्विस्ट येणार ? काय घडणार ? हे आगामी भागात कळेल.

यावेळी आपल्या सगळ्यांच्या लाडक्या कावेरीने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे, साजेसे असे दागदागिने देखील परिधान केले आहेत.

यावेळी आपल्या सगळ्यांच्या लाडक्या कावेरीने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे, साजेसे असे दागदागिने देखील परिधान केले आहेत.