अभिजीत खांडकेकरची सोलो ट्रिप; लेह-लहाखमध्ये भटकंतीचा अविस्मरणीय अनुभव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभिजीत खांडकेकरची सोलो ट्रिप; लेह-लहाखमध्ये भटकंतीचा अविस्मरणीय अनुभव

अभिनेता अभिजीत खांडकेकर सध्या सर्वांत लोकप्रिय पर्यटन स्थळ लेह-लडाखची भटकंती करत आहे. या भटकंतीचे फोटो आणि व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

लडाखला जाणं आणि बाईकवरून लडाख अनुभवणं हे अनेकांचं स्वप्न असतं. अभिजीतची ही सोलो ट्रिप असून ही सहल अविस्मरणीय झाल्याचं त्याने फोटो पोस्ट करत सांगितलं.

कुडाळ-मालवणमधून आलेल्या बाईकर्समुळे जगातल्या सर्वांत उंच (आता दुसऱ्या क्रमांकावर)खारदुंगला टॉपवर बुलेटवर जाण्याचं स्वप्न पूर्ण करता आलं, असं त्याने लिहिलं.

इतर वेळी भरपूर थंडी आणि बर्फाळ असलेल्या या प्रदेशात बाईकने फिरण्यासाठी जून ते सप्टेंबर हा सर्वात योग्य कालावधी आहे.

लदाखमध्ये अभिजीतला मिनी ट्रक (बोलेरो) चालवण्याची संधी मिळाली.

'जसजसं तुम्ही उंचीवर जाता, तसतसे रस्ते अजून खडतर आणि वातावरण बेभरवशाचं होत जातं. पण वाहन नेता येईल अशा जगातल्या दुसऱ्या सगळ्यात उंच (आता तिसऱ्या) रस्त्यावर ड्राइव्ह करून पोहोचणं यासारखा आनंद नाही,' अशा शब्दांत त्याने अनुभव मांडला.

लेह-लडाखमधील प्रवास हा वैविध्यपूर्ण आणि आव्हानात्मक असतो. पण जेव्हा तो अनुभव प्रत्यक्षात घेतो, तेव्हा त्यातील रोमांच कळून येतो.

रोजच्या गडबडीच्या शहरी जीवनात येणारा ताण लेह-लडाखचा निसर्ग पाहून निघून जातो.

अभिजीतच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स व कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

टॅग्स :Entertainment