अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (sankarshan karhade) हे नाव आता अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक झालं आहे. 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' या मालिकेतून त्याने झी मराठी च्या मंचावर पाऊल ठेवलं आणि उत्तरोत्तर प्रगती केली. अगदी छोट्याशा भूमिकेपासून ते प्रमुख भूमिका इथपर्यंत त्याने बाजी मारली. शिवाय कविता, नाट्यलेखन अशी त्याची मुशाफिरी सुरूच आहे. सध्या तो झी मराठी (zee marathi) वरील 'माझी तुझी रेशीमगाठ' (majhi tujhi reshimgath) आणि 'किचन कल्लाकार' (kitchen kallakar) या मालिकांमध्ये काम करत असून त्याने आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच फोटोशूट केला आहे. (sankarshan karhade first photoshoot)
अभिनय क्षेत्रात यायचं म्हंटलं कि तुमचा पोटोंशी अगदी जवळून संबंध येतो. अनेक कलाकार दर काही दिवसांनी फोटोशूट करत असतात. पण संकर्षणने मात्र पहिल्यांदाच हा फोटोशूट चा घाट घातला आहे.
या फोटोंना संकर्षणने भन्नाट कॅप्शन दिले आहे. तो म्हणतो, 'माझ्या आयुष्यातलं पहिलं फोटोशूट आहे. त्यामुळे Pose , Expressions सगळ्याचेच वांदे होते '
'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतील समीर हे पात्र संकर्षणने साकारले आहे. सध्या समीर हा यश,नेहा,परी या व्यक्तिरेखांइतकाच मराठी प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरला
आहे.
'जन्माला आल्यावर पोलिओ DOSE आणि फोटोशूट करतांना ही POSE… कंपल्सरी असते..' असेही कॅप्शन त्याने या फोटोंना दिले आहे.
झी मराठी वरील बहुचर्चित 'किचन कल्लाकार' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालनही संकर्षण करतो आहे. याशिवाय त्याच्या 'तु म्हणशील तसं' या नाटकालाही प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देत आहेत.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.