PHOTO : अण्णांची शेवंता दुबईत करतेय धमाल

अपूर्वा नेमळेकरने शेअर केले दुबई दौऱ्याचे खास फोटो...
apurva nemlekar dubai photo
apurva nemlekar dubai photosakal
Updated on

शेवंता हे नाव घराघरात पोहोचवणारी आणि शेवंता म्हणून ओळख मिळालेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सध्या बरीच चर्चेत आहे. अपूर्वाने या आधी नाटक, मालिका, सिनेमा यात बरेच काम केले आहे. परंतु 'रात्रीस खेळ चाले' या झी मराठीवरील मालिकेने तिला खरी ओळख मिळवून दिली. अपूर्वा ( apurva nemlekar ) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असते. मध्यंतरी तिने 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेला तिने रामराम केला. तिच्या नाराजीवर तेव्हा बरीच चर्चा झाली होती. त्यानंतर अद्याप अपूर्वाने आपल्या नव्या कामाची माहिती दिलेली नाही. पण सध्या ती सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. ती तिच्या आईला घेऊन दुबई मध्ये गेली आहे. त्याचे खास फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केलआहेत. (marathi actress apurva nemlekar Dubai trip photo)

अपूर्वा सध्या आईसोबत दुबईमध्ये समर वॅकेशन एन्जॉय करतआहे.
अपूर्वा सध्या आईसोबत दुबईमध्ये समर वॅकेशन एन्जॉय करतआहे.sakal
अपूर्वाला फिरण्याची प्रचंड आवड आहे. त्यामुळे ती असे दौरे करत असते.
अपूर्वाला फिरण्याची प्रचंड आवड आहे. त्यामुळे ती असे दौरे करत असते. sakal
हा दौरा मात्र तिच्यासाठी विशेष आहे. कारण यंदा ती आईसोबत आहे. अगदी विमानात बसल्यापासून ते प्रत्येक ठिकाणी ती आईसोबत फोटो शेअर करत आहे. तिची आई तिच्यासाठी सर्वस्व असल्याचेही ती म्हणाली आहे.
हा दौरा मात्र तिच्यासाठी विशेष आहे. कारण यंदा ती आईसोबत आहे. अगदी विमानात बसल्यापासून ते प्रत्येक ठिकाणी ती आईसोबत फोटो शेअर करत आहे. तिची आई तिच्यासाठी सर्वस्व असल्याचेही ती म्हणाली आहे. sakal
जगाचे लक्ष वेधणाऱ्या मिरॅकल गार्डनलाही तिने भेट दिली.
जगाचे लक्ष वेधणाऱ्या मिरॅकल गार्डनलाही तिने भेट दिली. sakal
जगातील सर्वात उंच इमारत मानल्या जाणाऱ्या बुर्ज खलिफा येथेही त्यांनी भेट दिली आहे.
जगातील सर्वात उंच इमारत मानल्या जाणाऱ्या बुर्ज खलिफा येथेही त्यांनी भेट दिली आहे. sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com