PHOTO : लाखात एक जोडा.. हृता दुर्गुळेच्या रिसेप्शनचे फोटो व्हायरल.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PHOTO : लाखात एक जोडा.. हृता दुर्गुळेच्या रिसेप्शनचे फोटो व्हायरल..

hruta durgule wedding reception photo viral

'फुलपाखरू' मालिकेतून घराघरात पोहोचलेली आणि विशेष म्हणजे जिने तरुणांना भुरळ घातली अशी अभिनेत्री हृता दुर्गुळे (Marathi Actress Hruta Durgule) नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकली. हृतानं डिसेंबर महिन्यात प्रतीक शाहसोबत साखरपुडा केला होता. ते बरीच वर्षे एकमेकांच्या प्रेमात आहेत. साखरपुड्यापासूनच त्यांच्या लग्नाची चर्चा होती. पण बुधवारी १८ मे रोजी हृताचे लग्न पार पडले. हृताने स्वत: लग्नाचे फोटो पोस्ट करत याबाबत माहिती दिली. अत्यंत दिमाखात हा सोहळा संपन्न झाला. आता तिने रिसेप्शनचे फोटो शेअर केले आहेत.. (Hruta Durgule Wedding Photo) (hruta durgule reception photo)

मराठी टेलिव्हिजन विश्वातील गोंडस अभिनेत्री म्हणून ऋताने (Hruta Durgule Wedding) आपली वेगळी ओळख बनवली आहे. ऋताने प्रतिक शहा सोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे जाहीर केले होते. यानंतर तिने डिसेंबरमध्ये त्याच्यासोबत साखरपुडा केला. इन्स्टाग्रामवर तिने आपल्या साखरपुड्याचेही फोटो शेअर केले होते

हा लग्न सोहळा बुधवारी १८ मे रोजी पार पडला. त्यानंतर एका खास लुक मध्ये हृता आणि प्रतिक समोर आले. त्यांच्या रिसेप्शनचे हे खास फोटो..

प्रतीक शाह हा हिंदी टीव्ही क्षेत्रात कार्यरत असून त्याची आई मुग्धा शहा या मराठी आणि हिंदी टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.  सध्या या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहे.

या लग्न सोहळ्याला काही मोजक्याच माणसांनी हजेरी लावली. यावेळी तिच्या आगामी 'अनन्या' सिनेमाचे लेखक दिग्दर्शक प्रताप फड उपस्थित होते.

मालिका विश्वातील तिचे अनेक सहकारी यावेळी हजर होते. हृताने यावेळी संपूर्ण कुटुंब सोबत फॅमिली फोटो देखील काढला आहे. हृता आता 'शाह' परिवाराची सून झाली आहे.

go to top