Tue, Sept 26, 2023
Gudhi Padwa: गिरगाव शोभायात्रेत कलाकारांची हजेरी.. रूपाली भोसले, समृद्धी केळकरसह अनेक कलाकार..
Published on : 22 March 2023, 4:38 am
आज हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा.. आजच्या दिवशी चैतन्याची गुढी उभारून नववर्षाचं स्वागत केलं जातं.
गुढी पाडव्यानिमित्त मुंबईत गिरगावमध्ये मोठी शोभा यात्रा निघते.
या शोभा यात्रेत दरवर्षी अनेक कलाकार सहभागी होत असतात.
यंदा अभिनेत्री रूपाली भोसले, समृद्धी केळकर, प्रिय मराठी पारंपरिक पोषाखात हजेरी लावली.
तर अभिनेता मिलिंद गवळी आणि अभिजीत खांडकेकर देखील मोठ्या उत्साहात या शोभा यात्रेचा भाग झाले होते.
यावेळी रांगोळ्या, पारंपरिक ढोलवादन, लोककला प्रकार, मराठी संस्कृती दर्शक रथ आणि मराठमोळ्या साजात रंगलेले हजारो तरुण या शोभा यात्रेत होते.