- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- मनोरंजन
- सप्तरंग
- YIN युवा
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- धन की बात
- क्रीडा
- आणखी..
- निवडणूक
- करिअर-नोकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- Myfa
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- दैनंदिन भविष्य
- साप्ताहिक भविष्य
- संपादकीय
- विज्ञान तंत्रज्ञान
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- ब्लॉग
- फुड
- आरोग्य
- काही सुखद
- प्रतिक्रिया-युनियन-बजेट
- वुमेन्स-कॉर्नर
- अर्थसंकल्प 2022
अचानक बंद करण्यात आल्या 'या' मराठी मालिका

लॉकडाउनमुळे सर्व क्षेत्रांचे मोठे नुकसान झाले. त्याचप्रमाणे मनोरंजन क्षेत्राला देखील मोठा फटका बसला. चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकर आणि निर्मात्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. काही मालिका कमी टीआरपीमुळे बंद करण्यात आल्या. त्या मालिका कोणत्या ते जाणून घेऊयात..

'काय घडलं त्या रात्री?' या मालिकेमध्ये अभिनेत्री मानसी साळवीने प्रमुख भूमिका साकराली होती. या मालिकेमध्ये संजय जाधव ,जयवंत वाडकर ,स्मिता गोंदकर,सुशांत शेलार,किशोर कदम ,चेतन वडनेरे या प्रसिद्ध मराठी कलाकारांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. लॉकडाउनच्या काळात या मालिकेचे शूटिंग बंद करण्यात आले. तसेच या मालिकेला टिआरपी देखील मिळत नव्हता. या मालिकेच्या कथानकानुसार बऱ्याच भागाचे आऊटडोअर शूटिंग होणे अपेक्षित होते. पण महाराष्ट्र शासनाच्या निर्बंधांमुळे ते शक्य झाले नाही. त्यामुळे ही बिग बजेट मालिका बंद करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला.

थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित 'सावित्री ज्योती' ही मालिका टीआरपी न मिळाल्यामुळे बंद करण्याचा निर्णय वाहिनीने घेतला.

'श्रीमंताघरची सून' या मालिकेला प्रेक्षकांची पसंती न मिळाल्याने ही मालिका बंद करण्यात आली. मालिकेचे कथानक अथर्व आणि अनन्या या भूमिकेंच्या प्रेम कथेवर आधारीत होते. मालिकेमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी प्रमुख भूमिका साकारली होती.

'मी होणार सुपरस्टार' या गाण्याच्या शोला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली नाही. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, प्रसिद्ध गायक राहूल देशपांडे आणि आदर्श शिंदे यांनी या शोचे परिक्षण केले होते. 21 एपिसोडनंतर हा शो बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

जानेवारी 2021 मध्ये हा सख्खे शेजारी हा शो प्रेक्षकांच्या भेटीस आला. या शोचे चित्रीकरण आउटडोअर करावे लागणार होते. महाराष्ट्र सरकारने आउटडोअर शूटिंगला परवानगी न दिल्यामुळे शो बंद करावा लागला. अभिनेता चिन्मय उद्गिरकरने या शोचे सूत्रसंचालन केले होते.

'चांदणे शिंपीत जाशी..' या मालिकेमध्ये अभिनेत्री अमृता धोंगडे आणि अभिनेता सचित पाटिल यांनी प्रमुख भूमिका साकारली होता. प्रेक्षकांची पसंती न मिळाल्याने ही मालिका 97 एपिसोडनंतर बंद करण्यात आली.

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.