भारतीय चित्रपट सृष्टीत 'ट्रॅजेडी क्वीन' म्हणून ओळखल्या गेलेल्या अभिनेत्री मीनाकुमारी यांचा जन्म १ ऑगस्ट १९३२ रोजी झाला. मीना कुमारी या नावानं त्यांनी बॉलीवूडमध्ये ओळख मिळाली मात्र त्यांचं मूळ नाव 'महजबी बानो' असं होतं. फक्त ३८ वर्ष जगणाऱ्या मीनाकुमारी यांनी चित्रपट सृष्टीत मोठं नाव कमावलं. (Meena Kumari life story in Marathi)
मीना कुमारी यांनी बालकलाकाराच्या रुपात बॉलिवूडमध्ये काम करायला सुरवात केली. त्यानंतर ३० वर्षांच्या सिनेसृष्टीतील करिअरमध्ये त्यांनी जवळपास ९० पेक्षा जास्त सिनेमांत काम केले. त्या एक उत्तम नर्तिका सुध्दा होत्या.
मीना कुमारी भारतीय चित्रपट सृष्टीत खुप मोठा चेहरा होता. मीना कुमारी या गायिका तसेच कवयित्रीदेखील होत्या. शायरी करण्याची त्यांना प्रचंड आवड होती. मीना कुमारी यांच्या प्रोफेशनल लाईफसोबतच त्यांचं खासगी आयुष्याही कायमचं चर्चेत राहिले.
१९५२ साली मीनाकुमारींची प्रमुख भूमिका असलेला ‘बैजूबावरा’ हा चित्रपट गाजला अन् त्या मशहूर झाल्या. त्याच वर्षी त्यांनी कमाल अमरोही या त्यांच्याहून वयाने १५ वर्षांनी मोठा असलेल्या शायर दिग्दर्शकाशी लग्न केलं. पण वैचारिक मतभेदांमुळे १९६४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. मीनाकुमारी या धक्क्यातून सावरल्या नाहीत आणि त्या गंभीर आजारी झाल्या. त्यांना दारुचे व्यसन लागले.
१९५३ साली फिल्मफेअर पुरस्काराला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या दोन्ही वर्षी ‘बैजू बावरा’ आणि ‘परिणिता’ या चित्रपटांतील भूमिकांसाठी त्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरल्या होत्या. सुंदर अभिनयामुळं फिल्मफेअर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेल्या मीना कुमारी या पहिल्या अभिनेत्री ठरल्या.
याकाळात त्यांना फार एकटे देखील वाटत होते. दिवस रात्र मद्याच्या आहारी गेल्याने, लिवर सिरोसिस आजारानं त्यांना वेढलं. त्यानंतर त्या चांगल्या झाल्या, मात्र अचानक ३१ मार्च १९७२ रोजी त्यांच निधन झालं. त्यावेळी त्या, फक्त ३९ वर्षाच्या होत्या.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.