कालिंदी बायोडायवर्सिटी पार्कमध्ये भरला पक्ष्यांचा मेळा | Kalindi Biodiversity Park | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कालिंदी बायोडायवर्सिटी पार्कमध्ये भरला पक्ष्यांचा मेळा

Kalindi Biodiversity Park

कालिंदी बायोडायवर्सिटी पार्कमध्ये (Kalindi Biodiversity Park) नैसर्गिक पद्धतीने पाणी स्वच्छ करण्याचा परिणाम दिसू लागला आहे. येथे निर्माण झालेल्या पाणथळ जागेत पहिल्यांदाच स्थलांतरित पक्ष्यांच्या (Migratory birds) आगमनाची नोंद होत आहे. उद्यानात एकूण 11 पाणथळ जागा तयार करण्याचे नियोजन असून, त्यापैकी सध्या दोन पाणथळ जागा तयार करण्यात आल्या आहेत. (Migratory bird fair in Kalindi Biodiversity Park)

1. यमुना नदी (Yamuna River) राजधानी दिल्लीतून (Delhi) सुमारे 54 किलोमीटर वाहते . परंतु, या भागात अनेक ठिकाणी उघड्या ओढ्यातील पाणी यमुनेमध्ये जाऊन नदी प्रदूषित होते. डीडीएने उभारलेल्या कालिंदी बायोडायवर्सिटी पार्कच्या संपूर्ण परिसरात अशा अनेक ओढ्यातील पाणी पूर्वी थेट यमुनेच्या पाण्यात जात असे. मात्र, आता येथील ओढ्यातील पाणी कंस्ट्रक्टेड वेटलँडद्वारे (wetland) स्वच्छ केले जात आहे. गेल्या दोन वर्षांत येथील बांधलेल्या पाणथळ जागेतून दररोज 40 ते 50 एनएलडी पाणी स्वच्छ केले जात आहे. तर या स्वच्छ पाण्यातून दोन वेटलैंड तयार करण्यात आली आहे. त्याचा परिणाम येथे दिसणाऱ्या पक्ष्यांच्या संख्येवर परिणाम झाला आहे.

2. ग्रे लॅग गूज, बार हेडेड गूज, व्हाईट टेल लॅपविंग, कॉमन कूट, नॉर्दर्न शोलर, कॉमन पोचार्ड सँड पायपर, ग्लॉसी आयबिस, ब्लू थ्रोट, रेड थ्रोट फ्लायकॅचर असे स्थलांतरित पक्षी प्रथमच येथे पाहायला मिळाले आहेत. उद्यानातील पर्यावरणाच्या सुधारण्याच्या कामात कार्यरत असलेल्या सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंटल मॅनेजमेंट ऑफ डिग्रेडेड इकोसिस्टमचे प्रमुख आणि शास्त्रज्ञ सीआर बाबू म्हणतात की, नैसर्गिक पद्धतीमुळे पाणी स्वच्छ करण्याच्या नैसर्गिक पद्धतीमुळे नदीच्या पाण्याची गुणवत्ता देखील सुधारणे शक्य होईल.

3. असे साफ केलं जाते पाणी  (How water is Cleaned?)- कन्स्ट्रक्टेड वेटलँड टेक्निकमध्ये नाल्यांच्या तोंडावर जाळी बसवली जाते. जेणेकरून त्यात असलेले प्लास्टिक किंवा धातू इत्यादींना प्रतिबंध करता येईल. त्यानंतर ते एका मोठ्या तलावात ठेवले जाते. त्यामुळे सर्व अशुद्धी तळाशी जाऊन बसतात. त्यानंतर पाणी दगड आणि पाणवनस्पतींच्या शृंखलांमधून जाते. त्यामुळे पाणी स्वच्छ होते आणि त्यातील ऑक्सिजनचे प्रमाणही वाढते. हे पाणी जलचरांसाठीही अधिक पोषक आहे.

4. पक्ष्यांच्या 130 पेक्षा जास्त प्रजाती (More than 130 Species of Birds)- कालिंदी बायोडायवर्सिटी पार्कचे शास्त्रज्ञ यासिर अराफत सांगतात की, या उद्यानात आतापर्यंत १३० प्रजातींचे पक्षी नोंदवले गेले आहेत. यातील अनेक पक्षी असे आहेत जे येथील सामान्य रहिवासी आहेत. तर बार हेडेड गूज आणि ग्रे लॅग गूज यांसारखे स्थलांतरित पक्षीही पहिल्यांदाच पाहायला मिळत आहेत. यावरून असे गृहीत धरता येईल की स्वच्छ पाण्यामुळे येथे पक्ष्यांना चांगली जागा मिळत आहे.

go to top