औरंगाबाद : शहरातील लेबर काॅलनी भागातील सरकारी वीस एकर जागा ताब्यात घेण्यासाठी जिल्हा प्रशासन, महापालिका, पोलिसांनी बुधवारी (ता.११) पहाटे कारवाई सुरू केली. प्रचंड पोलीस बंदोबस्त, जेसीबीचा ताफा, शेकडो अधिकारी- कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले. दुपारपर्यंत ३३८ घरांची सफाया करण्यात आली आहेत.
शासकीय वसाहत असलेल्या लेबर काॅलनी भाग रिकामा करण्यावरून चाळीस वर्षांपासून वाद होता.
प्रशासनाने ८ नोव्हेंबर २०२१ रोजी लेबर कॉलनीतील जागा ताब्यात घेण्यासाठी तयारी केली होती.
परंतु न्यायालयीन प्रक्रिया आणि तेथील मूळ रहिवाशांची बाजू ऐकण्यासाठी आजवरचा कालावधी गेला.
दरम्यान नागरिकांना घरे रिकामे करण्यासाठी बुधवारपर्यंत वेळ देण्यात आला होता.
त्यानुसार पहाटे पाच वाजेपासून अधिकारी- कर्मचाऱ्यांचा ताफा लेबर काॅलनी भागात दाखल झाला. त्यापूर्वीच बहुतांश रहिवाशांनी घरे रिकामी केली होती.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.