sakal

बोलून बातमी शोधा

सकाळी उठल्यावर करा ६ कामं; दुखणी जातील पळून!

morning

रोजच्या जगण्यातल्या आपल्या सवयी या जीवनशैलीच्या भाग बनतात. काही सवयी अजाणतेपणे तयार होतात. या सवयींमुळे कधी आपले नुकसान होते ते कळतही नाही. पण आपण जाणीवपूर्वक काही सकारात्मक सवयी निर्माण करू शकतो. तुमचा दिवस अधिक सुंदर बनवण्यासाठी काही सोप्या पण जीवन बदलणाऱ्या सवयी आहेत ज्या तुम्ही सकाळी उठल्यावर पाळता. आयुर्वेदात दिवसाची सुरुवात कशी करावी याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहे. सकाळी या गोष्टींचा अवलंब केल्याने दिवस सुरू होण्यापूर्वी तुम्हाला ताजेतवाने वाटेल.

सकाळी पाणी प्या- सकाळी उठल्यावर पहिल्यांदा एक ग्लास पाणी प्या. रात्री पाणी तांब्याच्या फूलपात्रात भरून ठेवा. सकाळी तेच पाणी प्या. असे केल्याने पोटाच्या समस्या दूर होतील. यामुळे सकाळी तुमच्या शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होईल.

शरीर आतून साफ करा- सकाळी उठल्यावर शरीरातील घाण काढून टाकणे गरजेचे असते. त्यामुळे शरीर आतून साफ होते. असे केल्याने दिवसभर तुम्ही ताजेतवाने राहता.

जीभ साफ करा- जीभ घासून स्वच्छ करावी. त्यामुळे रात्रभर तोंडात रात्री राहिलेले बॅक्टेरिया निघून जातात. तुमचे तोंड स्वच्छ होते. तसेच, तुमची पचनक्रिया चांगली होते.

डोक्याला करा मसाज- तुमच्या डोक्याला मसाज करा. सकाळी उठल्यावर डोक्याला तेलाने किंवा गरम तेलाने मसाज करा. यामुळे केसांची मुळे मजबूत होतील आणि टक्कल पडण्यापासूनही तुमची सुटका होईल.

योगा करा- आयुर्वेदात सकाळी उठून व्यायाम केल्याचे फायदे सांगितले आहेत. योगा किंवा कोणत्याही प्रकारचा व्यायाम केल्याने तुमचे शरीर लवचिक बनवते. तसेच, जर तुम्ही सकाळी व्यायाम केला तर तुम्ही दिवसभर फ्रेश आणि सक्रिय राहता. यामध्ये दीर्घ श्वास घेणे आणि ध्यान करणे हे प्रकार केल्यानेही फायदा दिसून येतो.

आयुर्वेदिक चहा प्या- तुमचा रोजचा चहा आयुर्वेदिक किंवा हर्बल चहाने बदला. सकाळी रिकाम्या पोटी नेहमीचा चहा प्यायल्याने जळजळ, अॅसिडिटी यासारख्या समस्या निर्माण होतात. त्याऐवजी, हर्बल चहा प्या. हा चहा प्यायल्याने तुम्हाला एनर्जी मिळेल.